जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा
मंगेश पाचभाई यांचे जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन
सुशील ओझा, झरी: संपूर्ण जग कोरोनाचा विळख्यातून जात आहे. शासन जनतेला अल्प दरात तसेच मोफत रेशन देत आहे. पण यातच
काही रेशन दुकानदारांना सामान्य जनतेला लुटण्याची जणू सोनेरी संधीच मिळाली आहे. त्यातच आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अनेक तक्रारी येताना दिसत आहे. त्यावर कार्यवाही होत असली तरी काही मुजोर व भ्रष्ठ रेशन दुकानदार लबाडी करून सर्वसामान्य लोकांच्या रेशनवर डल्ला टाकताना दिसत आहे. ही लबाडी रोखण्यासाठी रेशन दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी केली आहे.
संपूर्ण जिल्हयातील रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे थेट प्रेक्षपन तेथील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिक, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालयात केल्यास संपूर्न रेशन दुकांदारवर शासनाची आणि सामान्य जनतेची सुद्धा करडी नजर राहुन संपूर्ण रेशन वाटप हा पारदर्शक होईल. त्यामुळे रेशन वाटपात होणा-या भ्रष्टाचाराला आळा बसेल असे निवेदनात म्हटले आहे.