सुशील ओझा, झरी: दीड महिन्यापासून लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब मजुरदार यांचे मोठे हाल झाले असून त्यांच्या वर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. रोजमजुरी करणार्याच्या गरीब जनतेच्या हातातील रोजगार गेल्याने आपले कुटुंब जगविणे कठीण झाले आहे. तालुक्यातील जनतेला आधार मिळावे त्यांना दोन वेळेचे व्यवस्थित जेवण मिळावे याकरिता तालुक्यातील काही खासकी कंपनी, समाजसेवक, रेशन दुकानदार, किराणा दुकानदार, राजकीय पुढारी नेते, ग्रामपंचायत, खाजगी संथा, ग्रामवासी व शाळा यांनी पुढाकार घेऊन तालुक्यातील 2099 कुटुंबांना अन्नधान्य व किराणा समान वाटून सहकार्य केले व त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. तालुक्यातील एकवीशसे कुटुंबाला मदत मिळण्याकरिता तहसीलदार गिरीश जोशी व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांनी पुढाकार घेऊन वरील सर्वांना धान्य वाटप करिता जागृत केले.
लायन्स क्लब वणी तर्फे 818 किट ईशान मिनरल 125, प्रकाश म्याकलवार 32, सुर्या दिलाईट कंपनी 80, निर्मिती बहुउद्देशीय संथा वणी 30, युवा समाजसेवा ग्रुप अडेगाव 60, अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समिती झरी 20, जगती मायनिंग अडेगाव 50, स्वजन संथा पांढरकवडा तर्फे अजय ढोलकी तर्फे 152 ,संदीप बुरेवार व निलेश येल्टीवार 68, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळ 50, प्रयास संथा यवतमाळ 199,टॉपवर्थ ऊर्जा अँड मेंटल्स प्रा ली 54,खातेरा ग्रामवासी 14, नाम फाउंडेशन यवतमाळ 110,रास्त भाव दुकानदार संघटना झरी 100,राजीव आश्रम शाळा पाटण 27,व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तर्फे 200 असे एकूण 2099 किराणा समान व अन्नधान्य किटचे वाटप केले आहे.
गरीब जनतेला मोठा आधार मिळाला असून गरीब जनतेच्या मोठ्या प्रमाणात समस्यचे निराकरण करण्यात आले. मुकूटबन येथे सर्वात मोठी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू असून सदर कंपनीने एकाही गरीब जनतेला अन्नधान्य किंवा किराणा सामानाची मदत केली नसल्याचे नोंद तहसील कार्यालयात आहे. तहसीलदार जोशी व खिरेकर यांच्या पुढ्स्काराने तीन हजार कुटुंबियांना मदत मिळाली आहे. दोन्ही अधिकारी योग्य प्रकारे कर्तव्य पार पा़डत असल्याने तालुक्यातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.