बाहेर राज्यातून आलेले १७९ लोक होम कॉरेन्टाईन
आरोग्य विभाकडून रुग्णांकरिता २०० बेडची व्यवस्था
सुशील ओझा, झरी: तालुक्यात लॉकडाऊन दरम्यान ७५५ विद्यार्थी कर्मचारी व इतर लोक आपल्या घरी परतले सर्वांची आरोग्य तपासणी करून कोरोन टाईम करण्यात आले होते. त्यापैकी ६६२ जण १५ दिवस कोरोनटाईम राहून मुक्त झाले आहे तर १२९ जण आजही शाळेत व घरी कोरोन टाईम आहे. तालुक्यात मुंबई पुणे नागपूर चंद्रपूर यवतमाळ आदीलाबाद हैद्राबाद कोटा व इतर ठिकाण व राज्यातून लोक आल्याने त्यांना कोरोन टाईम करण्यात आले आहे. तालुका स्तरावर भविष्यात धोका निर्माण होऊ नये याची विचार करून तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी विशेष पाऊल उचलून रुग्णाकरिता २०० बेड ची व्यवस्था केली आहे.
बाहेर गावी जाणारे किंवा बाहेरून गावात येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करीत २४/७ आरोग्य कर्मचारी तपासनिकरिता कर्मचारी ठेवण्यात आला असून तपासणी नंतर कोरोन टाईम करता येणार आहे. बाहेर गावी जाणाऱ्या व्यक्ती करिता किंवा बाहेर गावावरून आलेल्या व्यक्तीची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याचे कार्य राजीव विद्यालय झरी येथे सुरू करण्यात आली आहे.
यवतमाळ व तेलंगणातून येणाऱ्या व्यक्ती मुळे तालुक्याला धोका निर्माण होऊ शकतो ज्यामुळे जनतेनी बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर रोक लावावी कुणालाही गावात येऊ देऊ नये आल्यास प्रशासनास कळवावे जेणे करून होणारा धोका टाळता येते अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी दिली.
यवतमाळ १०० किमी तर तेलंगणा ३ ते ५ किमी अंतरावर झरी तालुक्याला लागून असल्यामुळे याचे परिणाम तालुक्यातील जनतेला होऊ नये याकरिता यवतमाळ व तेलंगणातून येणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली आहे. तरी तालुक्यात दररोज लोकांची संख्या वाढत चालली आहे. तालुक्यातील जनतेला कोरोनापासून दूर ठेवण्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे आपले कर्मचारी आशा वर्कर मदतनीस आरोग्य सेविका व इतर विभागातील कर्मचारी असे २५० ते ३०० शंभर टक्के कर्मचारी २४ तास सेवा करीत आहे.