जीवन ढेंगळे यांचे नागपूरमध्ये निधन

परिसरात हळहळ व्यक्त

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुळेच वणी येथील रहिवाशी असलेले जीवन वसंतराव ढेंगळे (33) यांचे नागपूर येथे हृदयविकाराच्या धक्काने निधन झाले. ते वणीतील जैन लेआऊट येथील रहिवाशी होते व नोकरीनिमित्त नागपूर येथे स्थायिक होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे.

जीवन वसंतराव ढेंगळे हे नागपूर येथील गवळी उच्च प्राथमिक शाळा, भांदेवाडी येथील शाळेत कार्यरत होते. सोमवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

दुपारी त्यांचे पार्थिव नागपूरहून वणीत आणण्यात आले. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जीवन यांच्या मागे त्याचे आई-वडील, भाऊ, पत्नी असा आप्त परिवार आहे. सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणारे तसेच कालपरवा पर्यंत वणीतील व्यक्तींशी संपर्कात असलेले जीवन यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.