प्रेमनगर परिसरात ‘नाम’ फाउंडेशनची मदत

क्रांतीयुवा तर्फे 50 टिफिनची व्यवस्था

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील रेड लाईट एरियातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली अशी बातमी वणी बहुगुणीने केल्यावर या भागात काही प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे. मंगळवारी या परिसरात नाम फॉउंडेशनने आणि वणीतील काही सेवाभावी लोकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नाम फाउंडेशनतर्फे 15 किट देण्यात आल्या तसेच क्रांती युवा संघटनेतर्फे 50 टिफिनची व्यवस्था केली गेली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असून प्रशासनानी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे.

प्रेमनगरमध्ये वारांगना आपली देहविक्री करून पोटाची खळगी भरतात. सध्या कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असूनया बिकट समयी कुणीही लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संस्था यांच्याकडे मदतीसाठी फिरकले नसल्याची तसेच जे कुणी व्यक्ती आलेत त्यांनी केवळ नाव लिहून परत गेले. काही लोक टिफीन सेवा देत आहे मात्र ती तुटपुंजी असून मदत मिळाली नाही तर उपासमारीची वेळ येईल अशी आपबिती त्यांनी व्यक्त केली होती.

त्यांनी मदतीची मागणी केल्यावर क्रांती युवा आणि नाम फाउंडेशन तसेच काही सेवाभावी व्यक्ती यासाठी पुढे आल्यात. नाम फाउंडेशनतर्फे 15 किट तसेच क्रांती युवातर्फे 50 टिफिनची व्यवस्था करण्यात आली. तर उदयपाल महाराज वणीकर व राजू पिंपळकर यांनी धान्याची मदत केली. त्यामुळे काही काळपुरता तरी त्यांना दिलासा मिळाला आहे.

‘त्यांना आणखी मदतीची गरज’

आम्ही आधीपासूनच या भागात टिफिन सेवा देत आहोत. मदत अपुरी होती पण या क़डे दुर्लक्ष होते असे नाही. त्यांची परिस्थिती समजून आम्ही या भागाकडे अधिक लक्ष देईल. आता टिफिनमध्येही वाढ करण्यात आली अशी माहिती क्रांती युवा संघटनेतर्फे देण्यात आली. तर नाम फाउंडेशनचे स्वयंसेवक धीरज भोयर म्हणाले की आम्हाला शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. याआधीही तिथल्या 11 कुटुंबाला आम्ही मदत केली आहे. मात्र त्यांना मिळालेली मदत अपुरी असून त्यांना अजून पुरेशी मदत झालेली नाही. त्यांना आणखी काही किटची गरज आहे. अशी माहिती धीरज भोयर यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

मदत मिळाल्याने प्रेमनगर येथील कुटुंबाने समाधान व्यक्त केले आहे. आणखी मदतीची गरज असून नगर पालिका प्रशासने लवकरच मदत करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी धीरज भोयर (तालुका समनवयक, नाम फाऊंडेशन) कुणाल नागमोते, उदयपाल महराज वणीकर, राजू पिंपळकर, उमेश ढुमणे हे उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.