सीसीआयच्या कापूस खरेदीतही उत्तम कापसाला योग्य भाव नाही
शेतक-यांचे क्विंटलमागे 200-500 रुपयांचे आर्थिक नुकसान
जब्बार चीनी, वणी: सीसीआयकडे विक्रीसाठी जो कापूस येत आहे. त्यात शेतक-यांनी भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेला पहिल्या दोन वेचणीचा कापूस आहे. हा कापूस उत्तम प्रतीचा कापूस असतो. हा कापूस शेतक-यांनी फेब्रुवारी 2020 अखेरपर्यंत विकला असता तर शेतक-यांना 5 हजार 550 भाव मिळाला असता. पण आता त्या उत्तम कापसाला सीसीआयकडून 5 हजार 355 भाव मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे.
कापूस खरेदी करताना जीन मालकांच्या हिताच्या रक्षणार्थ व भारतीय कापूस निगमला फासदेशीर होईल. यासाठी ओलाव्याचे कारण व काडी कच-यामुळे येणारी तुट हे कारणे पुढे करीत शेतक-यांचा उत्तम प्रतिच्या कापसाला 5 हजार ते 5 हजार 300 रूपये दरम्यानचा भाव देऊन त्यांची आर्थिक बोळवण करीत आहे. कोणत्याही शेतमालाला बाजारात हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करणे हा शासन धोरणानुसार कायदेशीर गुन्हा आहे. पण खासगी व्यापारी हा गुन्हा दररोज उघड करतात.
आता तर सीसीआयमध्येही प्रत्यक्षात नसलेली कारणे समोर करीत शेतक-यांना उत्तम व लांब धाग्याच्या कापसाला हमी भावापेक्षा 200 ते 500 रूपये कमी देवून आर्थिक शोषण करीत आहे. केंद्रावर विक्रीसाठी आणत असलेल्या कापसात 90 टक्के कापूस पहिल्या दोन वेच्यातील आहे. कोरोनाच्या प्रकोपाने सर्वच अंदाज चुकले. कापूस खरेदी बंद राहिले. परिणामी साठवून ठेवलेला उत्तम कापूस शेतकरी विक्रीला आणत आहे.
सीसीआयच्या नेहमीच्या नियमाप्रमाणे मार्चनंतर येणारा कापूस कनिष्ठ दर्जाचा काडी कचरायुक्त व अधिक रूईचा आऊटटन व वाळलेल्या सरकीच्या कापूस समजून हमीभाव कमी केल्या जातो. या आधीच्या वर्षाला ही बाब लागू पडत असली तरी यंदा कोरोनाच्या प्रकोपाने बंद राहिलेल्या खरेदीमुळे शेतकरी कापूस विकू शकले नाही.
सीसीआयने जीन मालक व भारतीय कापूस निगम यांच्यातील कराराचा फायदा घेत कापसाचे हमी भाव 200 रूपयांनी कमी केले. त्यातच मागचा कापूस आहे. जीन मालक प्रति क्विंटल 35.60 किलो रूईचा आऊटटन धरून प्रक्रिया खर्च मागतात व दोन ऐवजी चार टक्क्यापर्यत तुट ग्राह्य धरावी अशी मागणी करतात. यातून जीन मालकांच्या हिताचे रक्षण होते तर सीसीआयच्या प्रक्रिया खर्च वाढतो.
वणी बहुगुणी आता टेलीग्रामवर. आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील ताज्या व महत्त्वाच्या बातम्या आणि घडामोडी मिळवा.