‘हा’ स्पॉट ठरतोय दारू तस्करीचा हॉटस्पॉट

दारुतस्करी करणाऱ्या 7 जणांवर कारवाई

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातून छुप्या मार्गाने दारूची अवैध वाहतूक करून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारू वाहतूक करणाऱ्या 7 जणांवर एसडीपीओ पथकाने कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या कार्यवाहीत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्व जण ब्राह्मणी रोडवरून अहेरी घाटातून दारू तस्करी करीत असल्याचे समोर आले आहे.

लॉकडाऊन असल्याने जवळपास दोन महिन्यानंतर दारूची दुकाने सुरू झाली. तेव्हापासून तस्कर दारू बंद असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पुरवीत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. सोमवार एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांना दारू तस्करीबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यांनी त्वरित आपल्या पथकास रवाना केले.

दुपारी 12 वाजतापासून 5 वाजेपर्यंत एसडीपीओ पथकाने कारवाई करीत सात जणांना अटक केली. या कालावधीत एकून तीन कारवाई करण्यात आली. पहिल्या कार्यवाहीत श्याम संभाजी दुर्गे (34) रा. दामले फैल वणी, अक्षय संजय तुरणकर (23) रा. जैन लेआऊट वणी, महेश बबन गायकवाड (29) रा. दामले फैल यांच्याकडून 25296 रुपयांची देशी दारू व मोपेड वाहन असा एकूण 65298 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याच ठिकाणी केलेल्या दुसऱ्या कारवाईत रवी रमेश कोल्हे (30) रा. रंगनाथ नगर, ऋषभ मारोती चुराणकर (19) रा. रंगनाथ नगर वणी यांच्याकडून 7670 रुपयांची देशी दारू व वाहन क्रमांक MH 34 XX 8630 असा एकूण 47670 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तर तिसऱ्या कारवाईत विशाल अशोक डोंगे (25) रा. भद्रावती, कुणाल प्रभाकर बीपटे (21) रा. भद्रावती या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 2910 रुपयांची विदेशी दारू व वाहन क्रमांक MH34 AV 4125 असा एकूण 45630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात इकबाल शेख, रवी इसनकर, संतोष कालवेलवार, आशिष टेकाडे, विजय वानखेडे, प्रदीप ठाकरे, अतुल पायघन,अशोक दरेकर यांनी केली.

वणी  बहुगुणी आता टेलीग्रामवर . आपलं चॅनेल (@Wani Bahuguni) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि वणी व परिसरातील  बातम्या आणि  महत्त्वाच्या घडामोडी मिळवा.

Leave A Reply

Your email address will not be published.