शेकडो शेतकरी कापूस व सोयाबीन पीक विम्यापासून वंचित

पीक विमा त्वरित न मिळाल्यास उपोषणाचा इशारा

0

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे गोरगरीब रोजमजुरदारासह शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तर अवकाळी पावसानेही शेतकरी मोठा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनाचा कापूस सोयाबीनची अजूनपर्यंत पूर्ण खरेदी शासनाकडून झाली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीकडून पीकविमा न मिळाल्याने शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी युवक काँग्रेसतर्फे उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन निघून महिने लोटले. शेतकऱ्यांच्या शेताचे सर्वे झाले. परंतु २०१९-२० चा पीकविमा शेतकऱ्यांना तटपुंजा मिळाला असल्याची ओरड सुरू आहे. कापसाचा विमा तालुक्यातील खडकडोह मंडल मध्ये शुन्य रुपये, माथार्जुन मंडल १५८०.६ रुपये, मुकूटबन मंडल १६९५.४ रुपये, शिबला मंडल ४७३९.७ रुपये, झरी मंडल ८१८० रुपये प्रमाणे मिळत आहे. तर सोयाबीनचा विमा २ हजार ते २ हजार ५०० रुपये एवढा कमी  मिळत आहे.

केळापूर तालुक्यातील पाटनबोरी येथे कापसाचा २३ हजार रूपये तर सोयाबीनचे ५ ते ६ हजार रुपये प्रमाणे पीक विमा मिळाला आहे. त्यामुळे केळापूर तालुक्याला वेगळा व झरी तालुक्याला वेगळा न्याय का असा सवाल विचारला जात आहे. केळापूर तालुका झरी तालुक्याच्या ११० मीटर अंतरावर असून शेतकऱ्यांत विमा कंपनी विषयी मोठा संताप व्यक्त केल्या जात आहे.

संबंधीत अधिका-यांना निवेदन सादर

पीक विम्याबाबत कृषी विभागाशी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता पाच वर्षची कापूस सोयाबीनची वेचणी व कंपनी प्रयोगाच्या प्लांट नुसार मंडल नुसार नुकसान भरपाई ठरविल्या जाते अशी माहिती कृषी अधिका-यांनी दिली. त्यार पाच वर्षांचा अहवाल आहे का असे विचारताच कृषी अधिकारी यांच्याकडून सोमवारी सांगतो असे उत्तर शेतक-यांना दिले.

उत्तरामुळे शेतकऱ्यांना समाधान न झाल्याने शेकरी संतापले व सण  २०१९-२० कापूस व सोयाबीनची चौकशी करावी व केळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या पीकविमा नुसार झरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा अन्यथा कोविड १९ च्या नियमांचे पालन करीत आमरण उपोषण करणार असल्याचे इशारा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदिप बुरेवार,  कृ उ बा समिती माजी संचालक निलेश येल्टीवार , भगवान चुकलवार,हरिदास गुर्जलवार, राहुल दांडेकर, दादाराव राऊत,कैलास डोहे, निलेश मेश्राम, निखिल चौधरी, राकेश गालेवार, श्रीकांत अनमूलवार, सुभाष कुडमेथे व सुनील कुमरे यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.