विवेक तोटेवार, वणी: 28 मेच्या रात्री वणीतील मोमीनपु-यात दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. त्यावेळी 14 आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आणखी 15 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींनी पांढरकवडा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला, परंतु न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळून लावला आहे.
28 मे रोजी रात्री 12.30 वाजता शहरातील मोमीनपुरा या ठिकाणी जमीर उर्फ जम्मू व इजहार शेख यांच्या गटात तुफान हाणामारी झाली. ज्यामध्ये काही जणांना गंभीर इजा झाली होती. पोलिसांनी वेळीच पोहचून 14 आरोपींना अटक केली. दोन्ही गटाद्वारे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर कलम 147, 148, 149, 324, 307, 427, 452, 188, 269, 504, 506 नुसार गुन्हे दाखल केले.
काही दिवसांनी यातील यातील पुन्हा 15 आरोपींना अटक करण्यात आली. या सर्वांनी पांढरकवडा सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु सर्व आरोपी एकाच क्षेत्रातील असल्याने व कोरोना विषाणूचे कारण देत न्यायालयाने यांचा जामीन फेटाळून लावला. याचिकाकर्ते जम्मू गटाकडून ऍड गाजी खान व निलेश चौधरी तर इजहार गटाकडून ऍड गणेश धात्रट व ऍड मुत्यलवार यांनी बाजू मांडली.