तेलंगणात मांगली मार्गे जनावरांची मोठया प्रमाणात तस्करी
पायदळ व चारचाकी वाहनातून राजरोसपणे रवानगी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) गाव परिसरातून मोठया प्रमाणात राजरोसपण पायदळ व चारचाकी वाहनांतून लगतच्या तेंलगाना राज्यात जनावरांची तस्करी होत आहेत. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेती उपयोगी जनावरे चोरी होत असल्याची ओरड आहेत. सदर तस्करीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मांगली (हिरापूर) मार्गे तेलगणा प्रांतात जाण्यासाठी केवळ 3 किमीचे अंतर आहेत. नेमका हाच पर्याय शोधून जनावर तस्कर याचा फायदा घेत आहे. आश्चर्यची बाब आतापर्यंत एकही तस्करांवर आजपर्यंत कारवाई झालेली नाही. परिणामी जनावर तस्करांचे मनोबल वाढून ते राजरोसपणे तस्करी करीत आहे. या तस्करीला तस्कर जसे शेतकरीच असल्याचे भासवून फार मोठया प्रमाणात जनावरे पायदळ सीमेबाहेर नेत आहेत.
तेलंगनातील तस्कर परिसरात एकाद्या स्थानिक व्यक्तीला सोबत घेऊन परिसरातील जनावरे एका ठिकाणी गोळा करून चारचाकी वाहनात निर्दयी कोंबून लगतच्या पैनगंगा नदी परिसरात पोहचवली जातात. तेथून मोठ्या चारचाकी वाहनातून आंध्रप्रदेशातील कत्तलखान्यात पाठविली जात असल्याची माहिती मिळत आहेत. या तस्करीकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहेत.