सावधान….! ‘त्यांनी’ वाढवली वणीकरांची कोरोनाबाबत चिंता

फ्लाईटमध्ये सापडला एक कोरोना पॉजिटिव्ह...

0

जब्बार चीनी, वणी: सध्या देशात कोरोना पिक पॉइंटकडे वाटचाल करतोय. देशातील एकून कोरोना पॉजिटिव्हच्या संख्येने 3 लाखांचा पल्ला पार केला आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही ही संख्या पावने दोनसेच्या आसपास पोहोचली आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. मात्र यापासून सुदैवावे वणी बाहेर असले तरी कोरोनाचे भय मात्र अद्यापही संपलेले नाही. 4 दिवसांआधी दिल्लीवरून विमानाने एक कुटुंब नागपूर व त्यानंतर वणीत आले. मात्र त्या फ्लाईटमध्ये एक प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. महत्त्वाचं म्हणजे परतलेल्या कुटुंबाने परसोडा येथील कोविड केअर सेंटरमधल्या अलगीकरण कक्षात दाखल केले जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती मिळत आहे.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वणीतील छोरिया लेआऊटमध्ये एक व्यक्ती कुटुंबासह राहते. त्यांची मुलगी व जावई हे दिल्लीला राहतात. त्यांना एक छोटेचे बाळ देखील आहे. 4 दिवसांआधी हे तिघेही दिल्लीवरून नागपूरला आले. त्यांना घेण्यासाठी वणीतून मुलीचे वडील कारने नागपूरला गेले. ते चौघेही कारने वणीत परत आले. नियमानुसार दिल्लीवरून आलेल्या प्रवाशांच्या हातावर विमानतळावरच होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात आला.

नागपूर एअरपोर्ट

विमानात एक कोरोना पॉजिटिव्ह…
ज्या विमानातून हे कुटुंब नागपूरला आले त्या फ्लाईटमध्ये एक कोरोना पॉजिटिव्ह आढळून आला. रुग्ण मिळताच प्रशासनाचे लगेच त्या फ्लाईटमधल्या प्रवाशांची माहिती घेऊन त्यांना तसेच स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती दिली. परतलेल्या व्यक्तींना लगेच आयसोलेट करून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घ्यावे असे निदेश देण्यात आले.

आयसोलेशन कक्षात न जाण्यासाठी फिल्डिंग ?
प्राप्त माहितीनुसार हे कुटुंब पाॉजिटिव्ह रुग्णांपासून दूर असल्याची माहिती आहे. मात्र तरीही खबरदारी म्हणून त्या फ्लाईटमधल्या सर्वच प्रवाशांना आयसोलेट केले जाते. त्या कुटुंबालाही आयसोलेट करण्याचे निर्देश वरून आले आहेत. वणी परिसरासाठी परसोडा येथे कोविड केअर सेंटर मध्ये अलगीकरण कक्ष आहे. मात्र त्यांनी त्या ऐवजी घरीच आयसोलेट होण्यासाठी आर्जव केल्याची माहिती आहे.

कोरोनाबाबत उदासिनता का ?
बाहेर राज्य तसेच कोरोनाबाधित क्षेत्रातून वणीत परतलेल्या लोकांनी आधी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देणे गरजेचे आहे. मात्र याबाबत चालढकल केली जात असून फ्लाईटने आलेले अनेक लोक हातावर आधीच होम कॉरेन्टाईनचा शिक्का असल्याने स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती देण्याकडे दुर्लक्ष करतात. या घटनेतही स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. अखेर फ्लाईटमध्ये कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण मिळाल्याने हा गंभीर प्रकार समोर आला. ते किती लोकांच्या संपर्कात आले याबाबत ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. वणीत जी व्यक्ती फ्लाईटने दाखल होत आहे अशा व्यक्तींबाबत प्रशासनाने ढिल नाही तर कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे.

संपूर्ण भारतात कोरोनाचा शिरकाव हा परदेशातून विमानातून आलेल्या प्रवाशांपासून झालेला आहे. डोमेस्टिक प्रवासातून याचा शिरकाव इतर ठिकाणी झाला. त्यामुळे या बाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पहिला रुग्णही विमान प्रवासानेच मिळाला होता. सध्या वणीत कोरोनाचा शिरकाव झाला नसला तरी जर योग्य ती खबरदारी न देता थोडी जरी ढिल देण्यात आली तर वणीत कोरोनाचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.