वणी ठाण्यात शांतता कमेटीची बैठक संपन्न

आगामी सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली बैठक

0

सुशील आडकिणे, राजुर: वणी पोलीस ठाण्यात आगामी गोकळ अष्टमी, पोळा, गणेश उत्सव, बकरी ईद, दुर्गोत्सव आदी सणउत्सवाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचं आयोजन ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांनी केले होते. या बैठकीत शहरातील शांतता समितीचे सदस्य, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Podar School 2025

या बैठकीत आगामी काळात होवू घातलेल्या उत्सवात शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासंबधी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मिरवणुकीदरम्यान घेण्यात येणारी काळजी व सहकार्य यावर चर्चा करण्यात आली. उत्सव काळात सहकार्य करण्याचे उपस्थितांनी स्पष्ट केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या बैठकीला शहरातील प्रतिष्ठीत, बॅंडपथक, मूर्तीकार, सामाजिक कार्यकर्ते, तथा नागरिक व महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.