कोरोनामुळे मंडप डेकोरेशन व्यावसायिक आर्थिक संकटात

आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

0

जब्बार चीनी, वणी: कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनचा मंडप डेकोरेशन व्यावसायिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. मंडप डेकोरेश्न असोसिएशनच्या वतीने आर्थिक सहायता मिळण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की मंडप डेकोरेशनचा व्यवसाय सिझनेबल प्रकारात मोडतो. या वर्षी कोरोना महामारीमुळे वणी परिसरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात लग्नाचे प्रमाण कमी व तेही साध्या पध्दतीने होत आहे. त्यामुळे मंडप डेकोरेशन व्यवसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या लोकांच्या बुकींग झाल्या होत्या त्यांना पैसे परत करावे लागले.

दरवर्षी मंडप व्यावसायिकांना लग्नाच्या सिजनमध्ये काम करून मिळालेल्या पैशातून वर्षभर उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु यावर्षी एकही काम मिळाले नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह वर्षभर कसा करायचा हा मोठा प्रश्न पडला आहे. शासनाने 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. त्यामुळे लग्न सराईत मंडप डेकोरेशन व्यवसाय बंद असल्याने व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

सरकारने कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेल्या मंडप डेकोरेशन व्यवसायीकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावार अरुण बिलोरीया, नईम शेख, दत्ता आस्कर, गजानन आस्वले, जगदीश चांदेकर, कुणाल कुंज, आकाश बिहारी, गजु गोहोकार, कवडू नागपुरे, सुशांत ढुमणे, मनिष सोमय्या, प्रविण वाघमारे यांच्या सहया आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.