देव, येवले, मुकुटबन: मुकुटबन पोलिसांनी गुरुवारी 17 ऑगस्टला अवैध दारू अड्यावर धाड टाकून देशी विदेशी दारू जप्त केली. दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून 5056 रुपयांची दारू जप्त केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिति समोर ताज पान सेंटर व कोल्ड्रिंक्समधून हा माल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ताज पान सेंटर ही पान टपरी आहे. या टपरीवर अवैध दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दुपारी 12 च्या सुमारात या पान टपरीवर धाड टाकली. यात अवैध दारू विक्री होत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या प्रकरणी सै.गफ्फार सै. शकुर (55) व नरेंद्र अरविंद मंदावार (26) रा. मुकुटबन या दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ही दारू आंध्रप्रदेशातून विक्री करीता आणली असल्याचं समोर आलं आहे. धाड टाकली तेव्हा पोलिसांसोबत दारूबंदी समितीच्या महिलाही उपस्थित होत्या. यामध्ये छबुताई महेश आसुटकार, कल्पना संजय आसुटकार, भारती प्रवीण आसुटकार सह इतर नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे या घटनेचा घटनास्थळीच पंचनामा करून दारूच्या बाटल्या सिल करून ताब्यात घेण्यात आल्या आहे.
आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत कलम 65(इ) नुसार गुन्हा दाखल आला आहे. सदर कारवाई पीआय गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पीएसआय नितीन चुलपार, एएसआय मत्ते, जमादार ताजने, टोंगे, कवरासे, कुमरे हे कारवाईत सहभागी होते.