पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ

चारापाण्याअभावी जनावरांचे होत आहे हाल

0

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस कोसळल्यामुळे पिके सुकन्याच्या स्थितीत आहे. जनावरांना चारापाणी मिळेनासा झाला आहे. परिणामी जनावरांसह गुराखी,शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.

वणी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात 9 व 12 जूनला दमदार पाऊस पडला. तेव्हापासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. अधूनमधून हलक्याफुलक्या पावसाच्या सरी येतात. पिकें व धुऱ्या बांधावरील गवत टवटवीत होते. परंतु जमिनीत खोलवर ओलावा नसल्याने आणि तीव्र उन्हामुळे पीके व गवत सुकत जाते.

शेतीकरिता जंगलांवर अतिक्रमण झाले आहे.परिणामी गुराखी किंवा शेतकऱ्यांना जनावरे शेतातील धुऱ्या बंधावरच चारावी लागते.पावसाअभावी जलाशये कोरडी पडलेली आहे. शेतातील कूपनलिकांची पाणी पातळी 300 फुटांपर्यंत खालावली आहे.

चारापाण्याअभावी जनावरे पाळणे कठीण होत आहे. त्यामुळे शेतकरी आपली जनावरे विक्रीसाठी गुरांच्या बाजारात नेतांना दिसून येते. उर्वरित दीड महिन्यात दमदार पाऊस न पडल्यास काय होईल, याची चिंता शेतकरी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.