तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करा

संभाजी ब्रिगेडची मागणी, प्रसासनाला निवेदन

0

जितेन्द्र कोठारी, वणी: महावितरण कंपनीने लॉकडाउन काळात प्रत्येक महिन्याला प्रत्यक्ष बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा सरसकट बिल पाठविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जास्तीचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर बसणार आहे. त्यामुळे शासनाने मार्च ते मे 2020 या तीन महिन्याचे वीज बिल सरसकट माफ करावे. अशी मागणी संभाजी ब्रिगेड वणी शाखाने केली आहे.

उन्हाळा व लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यात वापरलेली वीज अंदाजे तीनशे युनिटच्या वर गेलेली आहे. याचा अर्थ विज बिल मिळालं नसल्यामुळे विनाकारण तीनशे युनिटच्यावर विज बिल रक्कम अर्थात जास्तीचा भरणा सामान्य माणसाला करावा लागणार आहे.

100 युनिटच्या आत 3.46 रु. , 101 ते 300 युनीटपर्यंत 7.43 रु., 301 ते 500 युनीट पर्यंत 10.32 रु. व 501ते 1000 युनिट पुढे 11.71 रु. प्रति युनिट इतका वीज आकार (रेट) आहे. मात्र तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यामुळे सर्व नागरिकांना जास्तीच्या विज आकार (किंमत) बिल भरावे लागेल. तसेच बिलाच्या मूळ रक्कमेवर तब्बल 70 टक्के अतिरिक्त शुल्कच्या नावावर जोडण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट महाभयानक आहे. त्यात परिस्थिती अत्यंत कठीण आहे. शेतकरी, सामान्य नागरिकांसह छोटे उद्योग व्यवसाय अडचणीत आले असून दैनंदिन जीवन व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. अशा काळात बहुतेक लोक स्वतः भाड्याने राहत आहेत किंवा त्यांचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय हे भाड्याच्या दुकानांमध्ये सुरू आहेत. सामान्य माणूस लाॕकडाऊन या काळामध्ये प्रचंड अडचणीत आहेत. त्यावर महावितरण कंपनीने भरमसाठ बिले पाठवून लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मासिक वीज बिल न पाठवणे ही कंपनीची चूक आहे. असे असताना हा आर्थिक भुर्दंड सामान्य लोकांनी का भरायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कोरोना महामारी च्या धर्तीवर मार्च महिन्यापासून ३ महिन्याचे सर्वांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा आशयाचे निवेदन मा. नितीनजी राऊत, उर्जामंत्री महा. राज्य यांना उपविभागीय अधीकारी व उपविभागीय अभियंता (महावितरण), वणी यांचे मार्फत देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अजय धोबे, विवेक ठाकरे, ॲड अमोल टोंगे, दत्ता डोहे, आषीश रिंगोले, संदिप गोहोकार व इत्यादि उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.