बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करा

कृषि पदवीधर संघटनेची मागणी

0

सुशील ओझा, झरी: 30 जून 2020 रोजी कृषि पदवीधर संघटनेकडून यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुका कृषि विभाग यांना बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे या साठी निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्या ताबडतोब कारवाई करून बंद कराव्या. जेणेकरून कुठल्याही कंपन्या स्व:फायद्यासाठी बळीराज्याला फसवण्याचा विचार करणार नाहीत व बोगस बियाने बाजारात आणण्याची हिम्मत करणार नाही.

गेल्या आठ वर्षांपासून संघटना शेतकऱ्यांच्या सेवेत आहे आणि शेतकऱ्यांवर असे वारंवार होणारे अन्याय संघटना कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही निवेदनात दिला आहे. कृषि विभागात निवेदन देताना कृषी पदवीधर संघटनेचे झरी जामणी तालुका अध्यक्ष शुभम तुडमवार समवेत तालुका उपाध्यक्ष संतोष बरपटवार आदी उपस्थित होते..

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.