मुकुटबन येथे शिवभोजन कक्ष सुरु करा

छगन भुजबळ यांना थेट भेटून मागणी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन गरजू लोकानां जेवनासाठी दहा आणि पाच रूपयात जेवनाची व्यवस्था असलेले शिवभोजन कक्ष सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना थेट भेटून निवेदन देण्यात आले आहे.

Madhav Medical

मुकुटबन शहर हे औद्योगिकतेकडे वाटचाल करत आहे. परिसरात अनेक कंनपी आहेत. सिमेंट प्लान्टचे काम जोमात सुरू आहे. इथे तीन ते चार हजार कामगार रोजगाराच्या निमित्ताने आले आहेत. याशिवाय शिवथाळी ही गरीबांना एक आधार होऊ शकते त्यामुळे मुकुटबन येथे शिवभोजन कक्ष स्थापन करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी थेट महाराष्ट्र राज्य अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. या संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी त्यांच्यासोबर तालुक्यातील सहकारी उपस्थित होते.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!