आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये पावसाळी जम्बो ऑफर

इनव्हर्टर, यूपीएस व बॅटरीवर 10 एलईडी बल्ब मोफत

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील आझाद इलेक्ट्रॉनिक्स पावसाळी ऑफर लाँँच करण्यात आली. इनव्हर्टर, यूपीएस, ल्युमिनस बॅटरीच्या खरेदीवर ग्राहकांना जम्बो ऑफर देण्यात येत आहे. यात प्रत्येक इनव्हर्टर, यूपीएस व बॅटरीच्या खरेदीवर मोफत एलईडी बल्ब ग्राहकांना मिळणार आहेत. ही स्किम केवळ मर्यादीत काळासाठी असल्याने या योजनेचा ग्राहकांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने या काळात सर्वाधिक समस्या ही लाईटची असते. विविध कारणांमुळे लाईट जाण्याचे प्रकार या काळात अधिक वाढते. रात्री अपरात्री लाईट केव्हाही जाते. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. दरम्यान या समस्येपासून सुटका करण्यासाठी लोकांचा इऩव्हर्टर खऱेदीकडे मोठा कल असतो. ही बाब लक्षात घेऊन वणीतील खाती चौक, मार्केट रोड येथील आझाद इलेक्ट्रॉनिक्सतर्फे ब्रँडेड इनव्हर्टर व बॅटरी खरेदीवर गिफ्ट ऑफर लाँच करण्यात आली आहे. या प्रत्येक खरेदीवर 10 एलईडी बल्ब मोफत देण्यात येत आहे.

विविध क्षमतेचे इनव्हर्टर उपलब्ध – अमरवानी
आमच्या कडे विविध क्षमतेचे इनव्हर्टर, यूपीएस व बॅटरी उपलब्ध आहेत. ज्यावर फॅन, बल्ब यासह टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रिज, कुलर, कॉम्प्युटर इत्यादी गोष्टी लाईट गेल्यानंतरही सुरू करता येऊ शकते. पावसाळ्यात लाईटची समस्या असल्याने इनव्हर्टर, यूपीएस या सर्वसामान्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी अधिक माहितीसाठी एकदा आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी.
– संचालक, आझाद इलेक्ट्रॉनिक्स

टीव्ही, फ्रिज, वॉशिंगमशिन इत्यादींवरही 20 % सूट
आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. इथे सर्व होम अप्लायन्सेसवर ईएमआयची सेवेसह कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 20 टक्क्यांपर्यंतची आर्थिक सूट व एक आकर्षक गिफ्ट ही योजना काही काळासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी याचा लवकरात लवकर मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

Leave A Reply

Your email address will not be published.