नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात गेल्या 4 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून लॉकडाऊन सुरू आहे. चहा व पानटपरी सह छोट्या व्यसायिकांचे दुकाने उघडण्यास अद्यापही बंदीच आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे दुकाने सूरू करण्यासाठी द्यावी अशी मागणी भारिपतर्फे करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना तहसिलदारमार्फत निवेदन दिले आहे.
सध्या लॉकडाऊनवरून अनलॉकवर जाण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार टप्याटप्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. यात सरकारने काही व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास मुभा दिली आहे. मात्र अद्यापही चहा व पानटपरी, हॉटेल, ऑटो वाहन, झुणका भाकर केंद्र इत्यादी छोटे व्यावसायिकांना दुकाने उघडण्यास मुभा न दिल्याने सुमारे 5 महिन्यांपासून त्यांचे दुकानं बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या प्रकऱणी जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन या व्यावसायिकांना दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारिप बहुजन महासंघ मारेगावच्या वतीने तहसीलदार दिपक पुंडे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी भारिपचे तालुका अध्यक्ष पुंडलिकराव साठे, कैलास खाडे, प्रमोद भगत, योगेश पाटील, प्रशांत भगत इ उपस्थित होते.