शास्त्रीनगर अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी एसडीपीओंना निवेदन

गुन्ह्याचा तपास योग्य दिशेन होत नसल्याचा मुलीच्या पालकांचा आरोप

0

विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणी एका पीडितेच्या आईने एसडीपीओकडे या प्रकरणाचा तपास योग्य दिशेन होत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलीला वाईट उद्देशाने पळवून येण्याचे गंभीर प्रकरण असूनही या प्रकरणी पोलिसांनी सौम्य कलम लावून आरोपीला पाठिशी घालत आहे असा आरोप करण्यात आला आहे.

11 जुलै रोजी वणीतील शास्त्रीनगर येथील 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना पुण्यात नोकरी लावून देतो. तिथे तुम्ही बंगल्यात राहणार, तिथे तुम्ही 50 हजार रुपये महिना कमवाल असे आमिष दाखवून परिसरातच राहत असणारा आरोपी एहतेशाम याने तीन मुलींना पळवून नेण्याचा प्लान केला. 11 तारखेला एहतेशाम याने मुलींना गाडीवर बसवून मंदर रस्त्याने फिरवून आणले व पुण्याला जाण्याची परवानगी न मिळाल्याचे सांगून त्या तीन मुलींना पंचशील नगर येथील एका घरी ठेवले होते. मात्र एक दोन तासातच हे प्रकरण मुलींच्या पालकांना कळले व त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तीन मुलींना पोलीस स्टेशनला आणून पालकांच्या स्वाधीन केले.

हे प्रकरण आधीपासूनच संशयाच्या भोव-यात सापडले होते. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही सहभाग न असलेल्या पंचशील नगर येथील दोन भगिणींना रात्री पोलीस स्टेशनला आणून त्यांचा मारहाण व छळ केल्याचा आरोप दोन पीडित भगिणींनी केला होता. इतके गंभीर प्रकरण असूनही पोलिसांनी आरोपी एहतेशामवर तात्काळ गुन्हा दाखल न करता त्याला सोडून दिले होते. अखेर या दोन्ही पीडितांनी यवतमाळ येते जाऊन पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणी 27 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

हे प्रकरण गंभीर असतानाही पोलीस प्रशासनाने गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल न केल्याने आरोपीला तात्काळ जमानत मिळाली. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शुक्रवारी वणीत धरणे आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

आता या प्रकरणी शास्त्रीनगर येथील अल्पवयीन मुलीच्या आईने एसडीपीओंकडे तक्रार करून या प्रकरणाचा योग्य दिशेन तपास करावा व न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.