गरिबीमुळे कृष्णाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगणार ?

● डेमाडदेवी येथील टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षण थांबवण्याची वेळ

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहूल तालुक्यातील देमाडदेवी येथील अत्यंत गरीब भराडी समाज कुटुंबातील मुलगा कृष्णा बाजीराव शिंदे हा वर्ग 12 वीमध्ये कला शाखेतून 83:00% घेऊन उत्तीर्ण झाला. त्याची स्वप्न मोठा अधिकारी बनून गोरगरीब जनतेच्या सेवेत सदैव काम करण्याची इछा आहे. परंतु गरिबी परिस्थिती मुळे त्याचे स्वप्न भंगणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गरिबी परिस्थितून कृष्णाने १२ वि पर्यंत कसेबसे शिक्षण घेतले. परंतु पुढील शिक्षण कसं करायचं असा प्रश्न त्याच्यापुढे उभा आहे. त्याचे वडील दारोदारी भिक्षुकाचे काम करतात तर आई शेतावर मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा कसाबसा हाकतात. ते देखील मुलानी शिकून मोठं होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहे. त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न आहे. परंतु ते कसे पूर्ण करायचे असा प्रश्न पडला आहे.

गरीब व हुशार मुलगा कृष्णा शिंदे याला समाजकल्याण वसतिगृह येथे ऍडमिशन मिळाल्यास तसेच सामाजिक संघटना किंवा कार्यकर्ते तसेच राजकीय पुढाकाराने होऊन मदत मिळाल्यास कृष्णा याचे शिक्षण योग्य रित्या पुढे चालू शकते. त्याला दानशूर लोकांनी मदत करावी अशी अपेक्षा देखील परिसरातून व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.