तरुण युवकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

लॉकडाऊनमुळे पुण्याहून आला होता गावी

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणाचं नाव पवन कावडू ढोके (23) असून तो पुणे येथे शिक्षण घेत होता. लॉकडाऊन मुळे पवन हा आपल्या घरी परत आला. स्वतःजवळ कोणतेही कामधंदा नसल्याने तो विवंचनेत होता.

८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पवन घरून निघून गेला व गावाबाहेरील ग्रामपंचायतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गावातील काही लोकांना याबाबत माहिती मिळाली असता गावकरी घटना स्थळी धाव घेतली पवन याची चप्पल व शेला विहिरीजवळ आढळले. यावरून गावकर्यांनी विहिरीत शोध घेऊन बाहेर काढले.

तोंडात व नाकात पाणी गेल्याने पवनचा मृत झाल्याचे अंदाज काढण्यात आला. पवनच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. प्रेत शवविच्छेदना करिता झरी पाठविण्यात आले असून आत्महत्तेचे कारण कळू शकले नसून पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला जमा रंजना सोयाम राम गडदे व नीरज पातूरकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.