वणीत स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

13 ते 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन होणार स्पर्धा

0

जब्बार चीनी, वणी: स्वातंत्र्यदिना निमित्त रोटरी क्लबतर्फे वणी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धा ऑनलाईऩ (झूम प्लॅटफॉर्म) होणार असून यात विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसदेखील ठेवण्यात आले आहे.

दिनांक 13 ऑगस्ट रोजी स. 11 ते दु 2 पर्यंत वक्तृत्व सर्धा आयोजिक करण्यात आली आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी स. 11 ते दु. 2 पर्यंत देशभक्तीपर एकल गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी स.11 ते दु. 3 पर्यंत देशभक्ती गितावर एकल नृत्यू स्पर्धा आहे. ही स्पर्धा दोन गटात आहे. अ गट हा 06 ते 13 वयोगटासाठी आहे. तर गट ब हा 14 ते 18 वयोगटासाठी आहे.

या प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पारितोषिक 1500 रुपये, द्वितीय पारितोषिक 1100 रुपये तर तृतिय पारितोषिक 700 रुपये आहे. याशिवाय सर्व सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अचल जोबनपुत्रा 9822278776 या क्रमांकावर संपर्कावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या सर्व गटामध्ये केवळ प्रथम नोंदणी करणा-या 20 प्रवेशिकांनाच सहभागी होता होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे. या उपक्रमाची संकल्पना ऍड नीलेश चौधरी यांची असून प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. परेश पटेल, प्रा. रोहित वनकर, मयुर अग्रवाल, मयुर गेडाम, अचल जोबनपुत्रा आहेत. इच्छुक स्पर्धकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष निखिल केडिया व सचिव आशिष गुप्ता यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्लबचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.