लोकमान्य टिळक महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू
16 ऑगस्ट लास्ट डेट, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रक्रिया ऑनलाईन
जब्बार चीनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया बुधवार 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही सत्र 2020-21साठीची प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. BA, B.Sc. व B.com. भाग 1 प्रवेशाचे ऑनलाइन फॉर्म 12 ऑगस्ट 2020 ते 16 ऑगस्ट 2020पर्यंत भरावीत. ऑनलाइन प्रवेश फ्रॉम प्रिंटआऊट, मूळ कागदपत्रांची तपासणी आणि प्रवेश निश्चिती वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होईल.
हा कालावधी 17 ते 29 ऑगस्ट 2020 असा राहील. मुदतीनंतर आलेल्या आवेदकास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेता येणार नाही. कार्यालयीन वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 4 ही राहील. शनिवारी कार्यालय सकाळी ८ ते दुपारी 12 पर्यंत उघडे राहील. बी. एस. सी. भाग 1 आणि बी. कॉम. भाग १साठी ऑनलाईन प्रवेशफॉर्म 12 ते 16 ऑगस्ट 2020 पर्यंत भरावा.
ऑनलाइन प्रवेश फॉर्मची प्रिंटआऊट तसेच मूळ कागदपत्रांची पडताळणी 17 ते 18 ऑगस्टला होईल. प्रथम गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट 19 ऑगस्टला दुपारी 4 वाजता प्रकाशित होईल. प्रथम गुणवत्ता यादीतील प्रवेश 20 ते 21 ऑगस्टला निश्चित होईल. द्वितीय प्रवेश यादी 24 ऑगस्टला दुपारी 4 वाजता प्रकाशित होईल. द्वितीय गुणवत्ता यादीतील प्रवेश निश्चिती 25 ते 27 ऑगस्टपर्यंत होईल. तृतीय प्रवेश यादी 28 ऑगस्टला दुपारी 12 वाजता प्रकाशित होईल. तृतीय प्रवेश यादीतील प्रवेश निश्चिती 28 ते 29 ऑगस्टपर्यंत होईल.
मूळ कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय प्रवेश गुणवत्ता यादीत नाव समाविष्ट करण्यात येणार नाही. अधिक माहिती कॉलेजच्या www.ltmwani.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशी प्रवेशासंदर्भातील सूचना प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे आणि प्रवेशसमितीच्या संयोजकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.