मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑनलाईन कार्यशाळा गुरुवारी

विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम

0

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती:  स्थानिक आय. क्यू. एसी. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था  व वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यशाळा होणार आहे.  गुरुवार 13 ऑगस्टरोजी मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ही कार्यशाळा ऑनलाईन होणार आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मातीच्या गणेशमूर्ती घरच्या घरीच बनविण्याचे कौशल्य यात शिकायला मिळेल. त्यासोबतच आपण पर्यावरण संवर्धनाकडे एक महत्त्वाचे पाऊल उचलणार आहोत. असे प्रतिपादन वनस्पतीशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर मंजूषा वाठ तसेच वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेने केले आहे. मातीपासून गणपती तयार करण्याबाबत विद्यार्थ्यांना डॉ. मंजूषा वाठ मार्गदर्शन करणार आहेत.

गेल्या 15 वर्षांपासून अमरावती शहरात मातीच्या गणेश मूर्ती गणेशभक्तांना उपलब्ध करून देणारी ही आद्य संस्था आहे.  वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेचे नाव आजही घेतले जाते. यंदा संस्थेच्या उपक्रमाचे हे 15वे वर्ष आहे. संपूर्ण शहराला मूर्ती पुरवणे शक्य नसल्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा घेऊन त्या माध्यमातून लोकांनी मातीच्या गणेश मूर्ती स्वतःच्या स्वतः बनवून त्याचे पूजन करावे अशी अपेक्षा आहे.

करिता अशा पद्धतीच्या कार्यशाळा संस्था आयोजित करीत असते.  यंदा शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अशा पद्धतीची ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आय. क्यू. एसीचे समन्वयक डॉ. सतीश माळोदे, संस्थेचे संचालक डॉक्टर वसंत हेलावी रेड्डी तसेच गृहशास्त्र विभागप्रमुख व वेक्सच्या अध्यक्ष डॉ. अंजली देशमुख यांच्या परिश्रमातून ही कार्यशाळा साकारणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/ymLh2ZpSpT6SrCCn8 या रजिस्ट्रेशन लिंकवर रजिस्ट्रेशन करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.