जब्बार चीनी, वणी: गेल्या आठवड्यापासून वणीत कोरोनाच्या रुग्णसंख्येने अचानक उसळी घेत आज ही संख्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. आज तालुक्यात 5 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या ही 95 झाली आहे. यातील वसंत विहार येथे 4 रुग्ण आढळून आले आहे. यात 3 महिला व 1 पुरुष आहे. तर शिंदोला येथे 1 पुरुष पॉजिटिव्ह आढळून आला आहे.
आज यवतमाळ येथून तपासणी झालेल्या 28 व्यक्तींचे रिपोर्ट प्राप्त झाले. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह निघाल्या आहेत. तर आज 7 व्यक्तींच्या रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमध्ये सर्व व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. अद्याप 63 रिपोर्ट येणे बाकी आहेत. आता पर्यंत वणीतून 2316 टेस्ट करण्यात आल्या असून यात रॅपिड ऍन्टिजन टेस्टद्वारा 1031 तर आरटी पीसीआर स्वॅब द्वारा 1285 टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सध्या वणीत कोरोनाचे एकूण रुग्ण 95 असून यातील 51 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. यातील 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 42 रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत. यातील 37 व्यक्ती वणीतील कोविड केअर सेन्टर येथे तर 5 रुग्णांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. सध्या तालुक्यात एकूण 14 कन्टेन्मेंट झोन असून यातील ग्रामीण भागात 5 तर शहरी भागात 9 झोन आहेत.
शास्त्रीनगर येथे फवारणी
शास्त्रीनगर येथे कोरनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील काही नागरिकांनी खबरदारी म्हणून परिसरात फवारणी करून परिसर निर्जंतूक केला. वार्डातील अब्दुल रहिम, शेख शाबन शाह, आमिन शेख यांच्या तर्फे ही फवारणी करण्यात आली. सध्या शास्त्रीनगर परिसरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.