जब्बार चीनी, वणी: फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंग क्षेत्रातील सुप्रसिद्ध कॅडेन्स अकाडमीच्या ब्रँचचे वणीत थाटात उद्घाटन झाले. सोमवारी सकाळी वणी विधानसक्षा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व कॅडेन्स अकाडमीचे रुपेश कुमार यांच्या प्रमुख व गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंग संबंधीत विविध अभ्यासक्रमाचे क्लास लवकरच सुरू होणार असून सध्या ऍडमिशन प्रक्रिया सुरु आहे.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देशभरात नावाजलेल्या अकाडमीची वणीत ब्रँच सुरू होत असल्याबाबत समाधान व्यक्ते केले. परिसरातील विद्यार्थ्यांना प्रोफेशनल कोर्ससाठी विद्यार्थ्यांना नागपूर, पुणे, हैदराबाद इथे जावे लागत होते. आता शहरातच फॅशन डिझायनिंग आणि इंटेरिअर डिझायनिंग सारखे प्रोफेशनल कोर्स उपलब्ध झाल्याने त्याचा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. असे मनोगत यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व रुपेश कुमार यांनी अकडमीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वणीत आबड भवन समोर युनियन बँकेच्यावर टागोर चौक येथे कॅडेन्स अकाडमी याची शाखा उघडण्यात आली आहे. कॅडेन्स अकाडमीद्वारा 10 वी व 12 ऩंतर फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगसाठी तीन कोर्स उपलब्ध करून दिले गेले आहे. यात 10 वी नंतर एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स व दोन वर्षांचा ऍडव्हान्स डिप्लोमा तर 12 वी नंतर तीन वर्षांचा डिग्री कोर्स उपलब्ध आहे.
कॅडेन्स अकाडमी ही फॅशन आणि इंटेरिअर डिझायनिंगमधली देशातील एक नामवंत शैक्षणिक संस्था असून त्याची नागपूर, पुणे, रायपूर, हैदराबाद, अमरावती अशा मोठ्या शहरात 20 पेक्षा अधिक शाखा आहे. या कोर्ससाठी मेट्रोसिटीतील तज्ज्ञ फॅकल्टी विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. तसेच वार्षिक फॅशन शो, प्रदर्शनी यासह पास होणा-या विद्यार्थ्यांच्या जॉबसाठी प्लेसमेन्ट व्यवस्थाही अकादमीतर्फे करून दिली जाणार आहे.
कोर्ससाठी मोजक्या जागा असून प्रवेश मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवाहन कॅडेन्स अकाडमीचे संचालक मुकेश काठेड व विशाल डुंगरवाल यांच्यातर्फे करण्यात आले आहे. पत्ता: कॅडेन्स अकाडमी, आबड भवन समोर, दुसरा माळा, युनियन बँकेच्या वर टागोर चौक वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 8924842842 8924843843