पत्रकाराशी असभ्य वर्तनाचा ग्रामसेवकावर आरोप
पत्रकार संघटनेचे तहसीलदार व बिडीओ यांना निवेदन
नागेश रायपुरे, मारेगाव: आठवडा होऊनही ग्रामसेवकाने रहिवासी दाखला दिला नसल्याने एका पत्रकाराने रहिवासी दाखल्याची मागणी केली. त्या पत्रकाराला उडवाउडवीची उत्तरे दिलीत. ही वर्तणूक त्या पत्रकाराला असभ्य वाटली. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकावर तत्काळ कारवाईची मागणी झाली, यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघाच्याने तहसिलदार व बिडिओ यांना निवेदन दिले.
नीलेश म्हसे या ग्रामसेवकाने पत्रकारासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. ग्रामसेवक गाडेगाव-चनोडा गटग्रामपंचायतीत कार्यरत आहेत. गावातीलच निखील काकडे यांनी शैक्षणिक कामाकरिता रहिवासी दाखला मिळणेबाबत रीतसर मागणी केली. परंतु आठवडा होऊनही रहिवासी दाखला दिला नसल्याने. पत्रकार सचिन काकडे यांनी संबंधित ग्रामसेवकाला भ्रमणध्वनी वरून विचारणा केली. असता, तुम्ही विचारणारे कोण असे उलट उत्तर दिले.
निवेदनात म्हटलंय की, वास्तविक ग्रामसेवकावर ज्या गावांची जबाबदारी असते त्या गावांना आठवड्यात दोनदा तरी भेट देऊन जनतेचे तसेच समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असते. परंतु सदर ग्रामसेवक दुसऱ्या गावावरून गाडेगाव या ग्रामपंचायतीचा कारभार पाहत आहेत.
विविध आरोप ग्रामसेवकावर करीत कारवाईच्या मागणीचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मारेगाव शाखेने तहसीलदार तसेच बीडीओ यांना दिले. यावेळी सचिन काकडे, अनंता गोवर्धन, पंकज नेहारे, सचिन मेश्राम, सुदर्शन टेकाम , आनंद नक्षणे आदी उपस्थित होते.