विवेक तोटेवार, वणी: पावसाळ्यात सापांपासून दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. नुकत्याच सर्पदंशांच्या तीन घटना तालुक्यात वणी, कुरई आणि बेसा येथे झाल्यात. त्यातही शेतांवर काम करणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
सर्वत्र शेतिकामांची लगबग सुरू आहे. पावसाने शेतातसह सर्वत्र ओल आहे. त्यामुळे साप आदी जीव बाहेर येत आहेत. बेसावध असताना तिघांना सर्पदंश झाला. कुरई येथील सुधाकर जयराम बोठाले, बेसा (लाठी) येथील गुजाबाई अन्नाजी जांभुळकर आणि वणीतील गीता प्रमोद सहारे हे शेतात काम करीत असता त्यांना सर्पदंश झाला.
यांनी ग्रामीण रूग्णालयात भरती केले. त्यांवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. सर्वच साप हे विषारी नसतात. साप चावल्यावर लगेच प्रथमोपचार करून त्या व्यक्तीला दवाखान्यात न्यावे. पावसाळ्याच्या दिवसांत योग्य ती खबरदारी घ्यावी. साप दिसल्यास सर्पमित्रांना बोलवावे.