मुकुटबन येथे चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ
तपास थंडबस्त्यात, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे पंधरा दिवसात किराणा दुकानात चोरी, दुचाकी चोरी, पानटपरी व हॉटेल फोडणे अशा पाच चोरीच्या घटना घडल्याने गावकऱ्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नःचिन्ह उपस्थित होत आहे. चोरीच्या वाढत्या वाढले असतांना सुद्धा रात्रीची गस्त वाढविण्यात आली नाही.
चार दिवसापूर्वी मुकुटबन येथील मुख्य चौकातील निब्रड यांचा पानठेला व सेंगर यांचे हॉटेल चोरट्याने फोडले. परंतु मोठी चोरी नसल्याने दोघांनीही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. परंतु दोन दिवसांपूर्वी येथीलच स्टेट बँकेचे मॅनेजर जतीन बबनराव मुरकुटे यांची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एमएच ३४ क्यू ५५३४) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
१५ दिवसापूर्वी हाजी इकबाल यांच्या किराणा दुकानाची खिडकी तोडून ८५ हजाराची रोख रक्कम चोरी करण्यात आली. या पूर्वी राकेश ताडुरवार यांची दुचाकी, मुख्याध्यापिका ममता पारखी यांच्या मॅरेजहॉलचे काम सुरू सुरू असताना त्यांच्या मालकीच्या ८० ते ९० हजारांच्या सळाखी चोरी करण्यात आल्या.
याव्यतिरिक्त पाण्याची मोटारी चोरी, गाडीतील पेट्रोल चोरी, ट्रान्सफार्मार व ऑइल चोरी अश्या अनेक चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात मुकुटबन मध्ये घडल्या. या चोरीच्या घटनेचे तपास थंडबसत्यात पडले आहे.
तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुकुटबन व परिसरात कोळसा खदान, डोलोमाईट आहे. तर आशियातील सर्वात मोठी सिमेंट फॅक्टरीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कंपनीत परप्रांतीय कामगार तसेच अधिकारी मोठ्या प्रमाणात काम करीत आहे.
भुरटे चोरठ्यांची संख्या तर वाढली नाही ना अशी शंका गावकऱ्यांच्या मनात येत आहे. तरी मुकुटबन येथील वाढत्या चोरी प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.