राष्ट्रीय बंजारा टायगर्सची महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर

घाटंजीचे गजानन जाधव यांची प्रदेशाध्यक्षापदी निवड

0

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: राष्ट्रीय बंजारा टायगर्स या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सहमतीने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. या कार्यकारणीत घाटंजीचे गजानन जाधव यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच वसई येथिल आनंदा चव्हाण कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. प्रदेश सरचिटणीस भारत राठोड बुलढाणा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या कार्यकारणीत गोर बंजारा, धाडी बंजारा, लमाण बंजारा यांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले असून पुढे कार्यकारणी विस्तार करतांना बंजारा समाजातील इतरही घटकांना स्थान देण्यात येणार आहे. या कार्यकारणी त निवड करण्यात आलेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आप आपल्या जिल्ह्यात व राज्यात संघटना वाढीसाठी काम करावे व आपल्या समाजाच्या लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहावे शासकीय व ईतर कामात मदत करून सहकार्य करावे असे आदेश देण्यात आले आहे.

यात प्रदेश उपाध्यक्ष शेषराव आडे नवी मुंबई, ऍड. विनोद राठोड, विलास जाधव, एकनाथ राठोड, विलास राठोड, दरबार मेडकर, प्यारेलाल गुजर, ऍड. भरत पवार तर प्रदेश सचिव विकास चव्हाण, रणजीत राठोड, विकास पवार, रतीलाल चव्हाण, सुरेश पवार, सोमासिंग लमानी, अतीस राठोड, प्रल्हाद धामले, भाई लाल माळी, शिवराम गांगुले. प्रदेश संघटक शंकर पवार, जगदीश राठोड, नरसिंग राठोड, शिवाजी चव्हाण, भाईदास चव्हाण.

Ankush mobile

प्रेमसिंग गुजर, देवराम भिडे, प्यारेलाल जाधव, रवी राठोड, रवींद्र राठोड प्रदेश प्रसिध्दी प्रमुख मच्छिंद्र चव्हाण प्रदेश सहसचिव रोहित राठोड, अनिल राठोड, आप्पासाहेब राठोड, संदीप राठोड, भास्कर आडे, संभाजीला ल जाधव, विश्राम अहिरे, प्यारेलाल डांगे, अर्जुन जाधव प्रदेश सहसंघटक नारायण चव्हाण दारव्हा यवतमाळ, देशमुख राठोड, जयसिंग भादने, सुभाष मोरे, विजय डांगे, मुन्ना जाधव यासह सदस्य गणाची निवड करण्यात आली.

One Day Ad

या कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केल्या जात असून राष्ट्रीय सचिव राजु चव्हाण यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!