सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, अडेगाव व इतर काही गावांतील युवक नशेच्या आहारी गेल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. तालुक्यातील अनेक तरुण देशी-विदेशी दारू पिऊन नशा करीत होते. परंतु जवळपास दोन वर्षांपासून काही तरुण चक्क गांजा व अफीम सारख्या जीवघेण्या नशेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
मुकुटबन व परिसरात मोजके तरुण गांजा चिलममध्ये भरून कश ओढताना दिसत होते. परंतु दोन वर्षात गांजा ओढणाऱ्यांचा आकडा 100च्या वर पार झाल्याचे तरुणातच बोलले जात आहे. मुकुटबन येथील काही तरुण मुलं वणी व कायर येथून गांजा अफीम विकत आणून चिलमेच्या सहाय्याने धुवा उडवीत आहे. मुकुटबन, खडकी व मुकुटबन ते पाटण मार्गावरील जंगल भागात, सायंकाळी लेआऊटमधील खुली जागा, सातारा बार समोरील क्रिकेट ग्राउंडवर, पिंपरड रोडने, रेल्वेच्या पटरीने, गावातील चौकांत रात्री 12-1 वाजेपर्यंत उभे असतात.
बीएसएनएल टॉवरच्या टेकडीवर ग्रुपने बसून बिनधास्त गांजा व अफीमचा चिलमद्वारे धुवा उडवीत असतात. स्वतःच्या जीवनाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत जागी व्यसनी मुलांच्या पालकांनासुद्धा माहिती असल्याचे बोलले जात आहे. तर अनेक मुलांना घरून शाळेतून तंबीसुद्धा देण्यात आल्याची माहिती आहे. पूर्वी मोजके मुलं व्यसनी होते. आता मुलांची संख्या वाढली आहे. अडेगाव व परिसरातही गांजा व अफीम फुुंकणाऱ्या मुलांंच्या संख्येत वाढ झाली असल्याची मााहिती आहे. यावर पोलीस कारवाई का करत नाही असा सवालही उपस्थित होतो.
तालुक्यात अल्पवयीन मुले आधीच दारूच्या व्यसनात जास्त प्रमाणात असताना पालकापुढे नवीन संकट उभे झाले आहे. परिसरासह तालुक्यात गांज्या अफीम इतर कोणतेही नशेच्या वस्तू आणून विक्री करणाऱ्याचा वणी व कायर येथील विक्रेत्यांचा शोध घेऊन कार्यवाही करून तरुण मुलांचे भविष्य वाचविणे जरुरी झाल्याचे बोलले जात आहे.