आणि बाप्पांच्या विसर्जनसेवेत लागले वणी पोलीस प्रशासन

विसर्जनरथ संकल्पनेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

0

विवेक तोटेवार, वणी: पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाचे पालन करीत वणी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी गणेश विसर्जनासाठी विसर्जन रथाची व्यवस्था केली. विसर्जन रथासोबत तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. नगर परिषद व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी गणेश विसर्जनाकरिता कृत्रिम टँक, अग्निशामक, रुग्णवाहिका व लाईफ जॅकेट ज्यामुळे कोणतीही अप्रिय घटना होणार नाही. अशी चोख व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला.

मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी या पावन पर्वावर सार्वजनिक व घरगुती गणेश विसर्जन झाले. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव असल्याने अत्यंत साध्या पद्धतीने गणेश विसर्जन केले जात आहे. याकरिता पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. वास्तविक विसर्जन रथाची संकल्पना ही यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी अमलात आणली. या संकल्पनेला समोर नेत वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांनी विसर्जन रथाची संकल्पना पूर्णत्वास नेली आहे.

वणी तालुक्यात एकूण 31 सार्वजनिक विघ्नहर्त्यांची स्थापना केली गेली. यातील 25 वणी शहरात तर 6 ग्रामीण भागात स्थापन केले गेले. यातील जवळपास 11 सार्वजनिक गणपतीचे विसर्जन सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत झाले असल्याची माहिती वैभव जाधव यांनी दिली. विसर्जन रथाबरोबर तीन ते चार पोलीस कर्मचारी सोशल डिस्टनसिंगच्या पालनासह उपस्थित होते. ज्यांना कृत्रिम कुंडात गणेशाचे विसर्जन करायचे त्यांच्यासाठी ते ऐच्छिक होते. निर्गुडा नदीच्या वामनघाटावरसुद्धा गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली. सार्वजनिक गणेशासोबत तीन ते चार जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

नगर परिषद व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम कुंड तयार करण्यात आलेत. सोबतच त्याच ठिकाणी आरती, सॅनिटायझर याचीही व्यवस्था करण्यात आली. नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी वणी बहुगुणीशी बोलताना सांगितले की, नदी घाटावर लाईफ जॅकेटसोबत दोन जलतरणपटू ठेवण्यात आले आहे. लाईफ जॅकेची व्यवस्था करण्यात आली आहे की ज्यामुळे कोनतीही अप्रिय घटना होऊ नये. निर्माल्य विसर्जन करण्याकरिता कुंड, कचरा होऊ नये म्हणून कचरापेटी, रुग्णवाहिका, अग्निशामक याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सव अगदी साध्यापणाने साजरा करण्यात आला. गणेशाची कोणतीही रॅली काढण्यात आली नाही. सोबतच कोणताही गाजावाजा नाही. अगदी कमी गणेश भक्तासह गणेशाला निरोप देण्यात आला. या विघ्नहर्त्याने कोरोनापासून या देशाचे सोबतच जगाचे रक्षण करण्याची मागणी सर्व गणेश भक्त यावेळी करताना दिसले.

लिंकवर क्लिक करून पाहा बातमीचा संपूर्ण व्हिडीओ…

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.