झरी नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहराला घाणीचा विळखा

रोगराई पसरण्याची भीती बळावली

0

सुशील ओझा, झरी: संपूर्ण परिसरात अस्वच्छतेने कळस गाठला आहे. झरी येथे सर्वच शासकीय कार्यालय कॉलेज, शाळा, बँक न्यायालय आहे. आठवड्यातून एकदा बाजार भरतो. बाजारात खेडेगावातील दुकानदार तर परिसरातील गावातील हजारोच्या संख्येने जनता खरेदी करीत येतात. ज्यामुळे रस्त्यावर कार्यालयाजवळ पानटपरी मुख्य मार्गावर सर्वत्र घाण व कचरा पडून असल्याने रोगराई पसरण्याची भीती बळावली आहे.

पावसामुळे रस्त्यावर पडलेला भाजीपाला असो किंवा कचरा सडून दुर्गंधी पसरली आहे. कचरा सफाईकरिता नगरपंचायतीद्वारे काँट्रॅकटर नियुक्त केला. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसापासून काँट्रॅकटरद्वारे झरी शहरातील सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामवासियासह व्यापाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. सफसफाई होत नसल्याने घाण पसरल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला. तरीसुद्धा नगरपंचायत गप्प का बसली आहे, असाही संतप्त प्रश्न जनता उपस्थित करीत आहे.

सदर काँट्रॅक्टर हा खामगाव येथील आहे. तो तिथूनच कारभार चालवत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. याकडे नगराध्यक्ष मुख्यधिकारी व नगरसेवकसुद्धा कानाडोळा करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकमेव नागरपंचायत व १७ ते १८ नगरसेवक असूनसुद्धा सदर काँट्रॅकटर व सफसफाईकडे लक्ष देत नसल्याने शंका व्यक्त होत आहे.

नगरपंचायत अंतर्गत संपूर्ण वॉर्ड व शहराची साफसफाई नगर पंचायतीच्या दुर्लक्षामुळे होत असल्याचा आरोप स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे यांनी केला आहे. तरी झरीची संपूर्ण सफसफाई करून जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणीसुद्धा लेंडे यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.