तालुक्यात कोरोनाचा विस्फोट…. आज 20 पॉजिटिव्ह

रुग्णसंख्येने तोडला रेकॉर्ड... कोरोनाने पसरले ग्रामीण भागातही पाय...

0

जब्बार चीनी, वणी: आज शुक्रवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी कोरोनाने रुग्णसंख्येचे आधीचे सर्व रेकॉर्ड तोडले. आज तब्बल 20 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याआधी 24 ऑगस्टला 18 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज 20 रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यात 17 रुग्ण हे आरटी-पीसीआर (स्वॅब) टेस्टने तर 3 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टने पॉजिटिव्ह आले आहेत. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यात टेस्ट करून पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या 209 झाली आहे. तर कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 232 झाली आहे. यात इतर ठिकाणी जाऊन टेस्ट करणा-यांचाही समावेश आहे.

यवतमाळ येथे सॅम्पल पाठवण्यात आलेल्या 292 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी होते. त्यातील 50 व्यक्तींचे रिपोर्ट आज आले. यात 17 पॉजिटिव्ह आलेत. या रुग्णांमध्ये सावंगी न. (नायगाव) येथे 6, भालर येथे 2, उकणी येथे 1, लालगुडा येथे 1, सावरकर चौक येथे 2, रंगनाथ नगर 2, सेवा नगर 1, रवी नगर 1, गुरूनगर येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. तर रॅपिड ऍन्टिजन नुसार व्यक्ती पॉजिटिव्ह आल्या आहेत. यात गणेशपूर येथे 1, राजूर येथे 1 तर चिखलगाव येथे 1 रुग्ण निष्पन्न झाला आहे.

13 कोरोनामु्क्त रुग्णांना सुट्टी
तालुक्यातील एकूण 209 रुग्णांपैकी 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 76 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. यातील 38 रुग्णांवर कोविड केअर सेन्टरमध्ये उपचार सुरू असून 38 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 11 रुग्णांवर यवतमाळ येथील जीएमसी येथे उपचार सुरू आहे. तर आज 13 कोरोनामुक्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.

सध्या तालुक्यात एकूण कंटेन्मेंट झोन 72 असून यातील ग्रामीण भागात 24 तर शहरी भागात 48 कन्टेन्मेंट झोन आहे. यातील 60 झोन ऍक्टिव्ह आहेत. यातील ग्रामीण भागात 19 व 41 शहरी भागात ऍक्टिव्ह आहेत.

सध्या परसोडा कोविड केअर सेन्टरला 38 रुग्ण भरती आहेत. तर 11 रुग्णांवर यवतमाळ जीएमसी येथे उपचार सुरू आहे. आज 31 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. अद्याप 272 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.

कोविड केअर सेन्टर परसोडा

तालुक्यात सध्या कोरोनाचा तांडव सुरू आहे. आधी शहरापुरत्या असणा-या कोरोनाने आता ग्रामीण भागातही चांगलेच हातपाय पसरले आहे. आज सावंगी सारख्या खेड्यात कोरोनाने सिक्सर मारला आहे. यासह वणी शेजारील ग्रामीण भाग यातही कोरोनाची रुग्णसंख्या सारखी वाढत आहे. तीन दिवस यवतमाळहून रिपोर्ट न आल्याने कोरोनाची संख्या कमी होती. मात्र आज रिपोर्ट आल्याने अचानक रुग्णसंख्या वाढली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने आता कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे. शिवाय वणीकरांनी देखील अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.