भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी रवि बेलूरकर
धडाडीच्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याची निवड झाल्याची पक्षातून प्रतिक्रिया
जब्बार चीनी, वणी: भारतीय जनता पार्टीची जिल्ह्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात वणीचे रवी बेलूरकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. एका धडाडीच्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
रवि बेलूरकर हे विद्यार्थी चळवळीतून आलेले कार्यकर्ते असून विद्यार्थी दशेपासून ते भारतीय पक्षाशी संलग्नित एबीवीपी या संघटनेशी जुळलेले होते. या काळात त्यांनी एबीवीपीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर केवळ आवाज उठवला नाही तर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न केला.
पुढे त्यांनी भाजपसाठी कार्य केले. ज्या काळात परिसरात भाजप केवळ नाममात्र होती त्या काळात त्यांनी भाजपची धुरा खांद्यावर लिलया पेलली व परिसरात पक्षाला नवचैतन्य दिले. त्यांच्या या कामाची दखल घेत पक्षाने त्यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाने दणदणीत यश मिळवले होते.
सामाजिक व धार्मिक क्षेत्रातही अग्रेसर
युवकांचे विविध प्रश्न असो गोरगरीबांचे प्रश्न हे सोडवण्यासाठी रवि बेलूरकर यांची कायम सक्रिय भूमिका राहिली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासह त्यांनी विविध आंदोलनं व उपक्रम राबवित पक्षाच्या ध्येय धोरणांची जपणूक केली आहे. यासह ते शहरात असणा-या श्रीराम जन्मोत्सव समितीचे गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात श्रीराम जन्मोत्सव धडाक्यात साजरा होतो.
रवि बेलूरकर यांच्या रुपाने पक्षाने कायम सर्वसामान्यांशी जुळलेल्या एका धडाडीच्या कार्यकर्त्याला व निष्ठावंताचा सन्मान केल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पक्षाने दिलेल्या नवीन जबाबदारीमुळे कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान – रवि बेलुरकर
माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठी जबाबदारी देऊन पक्षाने सन्मान केला आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू. पक्ष संघटन मजबूक करणे असो किंवा सर्वसामान्यांच्या विषय सोडवणे असो पक्षाने दिलेली पताका खांद्यावर घेऊन पक्षाच्या कार्यासाठी कायम तत्पर राहून काम करू. पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करून दाखवण्याचा प्रयत्न करेल.
– रवि बेलूरकर, जिल्हा सरचिटणीस भाजप