रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील ३६ वर्षीय तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाला. हा मृत्यू मारहाणीतून झाल्याची चर्चा गावात आहे. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
शंकर घनश्याम तेलंग (३६) हा वांजरी या गावात राहतो. त्याच गावात सुधीर तेलंग हा त्याचा चुलत भाऊ देखील राहतो. सुधीरची गावात पानटपरी आहे. गुरूवारी रात्री शंकर खर्रा घेण्यासाठी सुधीरच्या पानटपरीवर गेला होता. खर्रा घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. यात मारहाण सुद्धा झाल्याची चर्चा आहे. शंकरच्या शरीरावर व मांडीवर मारहाण केल्याच्या जखमा आहेत. या मारहाणीत शंकर गंभीर जखमी झाला होता. पण शंकर हा दारूच्या नशेत असल्याने त्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले.
शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास शंकरला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यावेळी तो मृत असल्याची नोंद डॉक्टरांनी केली. ग्रामीण रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
(मयत अरविंद घुगुल यांच्या कुटुंबाला शेतकरी आत्महत्येचा लाभ द्यावा)
सदर घटनेत कोणता प्रकार आहे याचा तपास ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश निर्मल करीत आहे. मात्र एक की घटना गुरूवारची असतांना त्याला शुक्रवारी उपचारासाठी का दाखल करण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे.