आज वणीत 14 पॉजिटिव्ह, कोविड सेंटरमधील गैरसोयीबाबत वणीकरांमध्ये रोष

वणीतील संशयीताचा आजार बरा झाला पण रिपोर्ट आला नाही

0

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. आज तालुक्यात तब्बल 14 रुग्ण आढळून आलेत. यात आरटीपीसीआर स्वॅब नुसार 5 तर ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार 9 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 283 झाली आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे यवतमाळ येथून रिपोर्ट येण्याची प्रक्रिया मंदावली आहे. एका आठवड्यापेक्षा अधिक काळ होऊनही स्वॅब घेतल्यानंतरही त्या व्यक्तीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. 267 रिपोर्ट येणे अद्यापही बाकी आहेत. दरम्यान आज परसोडा येथील कोविड केअर सेन्टरमध्ये होणा-या रुग्णांच्या गैरसोयीबाबत संतप्त झालेल्या वणीकरांनी वागदरा येथील अपंग निवासी शाळेतील प्रस्तावित कोविड केअर सेन्टरला विरोध करत ते सेन्टर रद्द करावे व शहरातील इतर सुसज्ज अशा ठिकाणी कोविड सेन्टर सुरू करावे अशी मागणी केली.

आज यवतमाळहून 19 रिपोर्ट आलेत. यात 5 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 13 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 44 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 9 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आलेत. तर 35 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

सध्या तालुक्यात 283 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 201 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 79 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. 03 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आज 22 व्यक्ती कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 22 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या कोविड सेंटरला 48 व्यक्तींवर उपचार सुरू असून 31 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 76 व्यक्ती भरती आहेत.

संशयीताचा आजार बरा झाला पण रिपोर्ट आला नाही
एकीकडे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे यवतमाळ येथून स्वॅबद्वारा करण्यात येणा-या आरटीपीसीआर टेस्टचे रिपोर्ट येण्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. वणीतील जैन स्थानक परिसरातील एका संशयीताची 1 सप्टेंबर रोजी कोरोनाचे लक्षण असल्याने आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली व त्यांना होम कॉरन्टाईऩ करण्यात आले. ती व्यक्ती तीन दिवसांआधी ठणठणीत बरी झाली. मात्र त्या व्यक्तीचा रिपोर्ट अद्यापही यवतमाळहून प्राप्त झालेला नाही. आता बरे झाल्यावर जर रिपोर्ट पॉजटिव्ह आला तर आणखी 14 दिवस मानसिक त्रास सहन करावा लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.

रिपोर्टमध्ये होणारी दिरंगाई हे देखील वणीकरांसाठी धोक्याची घंटा आहे. रिपोर्ट प्राप्त न झाल्याने त्या संशयीतांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा बिनदिक्कत वावर सुरू आहे. शिवाय रिपोर्टला दिरंगाई होत असल्याने रुग्णांची संख्या कळण्यासही वेळ लागत आहे. दरम्यान आज 36 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून ते यवतमाळ य़ेथे पाठवण्यात आले आहे. अद्याप 267 व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.