कर्ज मंजूर करण्यासाठी चक्क शरीरसुखाची मागणी
वणीतील मायक्रो फायनान्सच्या कर्मचा-यावर गुन्हा दाखल
नागेश रायपुरे, मारेगाव: मायक्रो फायनान्स कंपनीतील एका कर्मचा-याने कर्ज मंजूर करून देण्यासाठी एका महिलेस चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहिती नुसार आरोपी सचिन भगत (30) हा वणी येथील मायक्रो फायनान्स SIK या बचत गटाच्या कंपनीचा गट वितरण अधिकारी म्हणून कार्यरत आहे. फिर्यादी महिलेला बचत गटाच्या कामासाठी कर्जाची गरज होती.
फिर्यादी महिलेने 26 ऑगस्ट रोजी बचत गटाच्या कर्जासाठी आरोपीच्या मोबाईलवर विचारणा केली असता आरोपीने त्यांना कागदपत्र मोबाईलवर पाठवण्यास सांगितले. त्या प्रमाणे फिर्यादी महिलेने कागदपत्र मोबाईल व्हाट्सऍपॉवर पाठवले.
दुस-या दिवशी फिर्यादी महिलेने आरोपीस कर्जाबाबत विचारणा केली. त्यावर तुम्हाला कॉल करून कळवतो असे सचिन भगत याने सांगितले. 6 सप्टेंबर रोजी फिर्यादीने 3 वाजता दरम्यान आरोपी कॉल करून कर्जा बाबत विचारणा केली. तेव्हा मात्र आरोपीने शरीरसुखाची मागणी केली. तसे न केल्यास कर्ज मंजूर होणार नाही अशी धमकीही दिली. असा आरोप फिर्यादीने केला.
आरोपीची अजब अट ऐकून महिला हादरली. तिने या प्रकरणी महिलेने तक्रार कऱण्याचा निर्णय घेतला. महिलेने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. आरोपी सचिन भगत याच्यावर भांदवि कलम 509, 507 अंनव्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.