अत्यंत उत्साहात साजरा झाला ‘प्रयास’चा शिक्षकदिन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपक्रम ऑनलाईनच

0

सुशील ओझा, झरी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपक्रम ऑनलाईनच झालेत. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांची शिकण्याची अभ्यास करण्याची आवड कमी झाली नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव शिक्षकदिनी शिक्षक आला.

विविध वेशभूषा धारण करून ऑनलाईन शिकवण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. त्यासाठी त्यांना संस्थेच्या अध्यक्षा सुनीता काळे तसेच सचिव जितेंद्र काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात ७० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. त्यात प्रिया घाटे, नताशा बेसरकर, श्रुती घाटे, श्रेया रागीलवार, प्रणव गारघाटे, मानव दखने, खुशी ठावरी, प्रिंसी नवले, परी पेटकर, गायत्री महाकुलकर, श्रावणी मेश्राम, तेजू ठावरी, महती ठावरी,

गुंजन पिंपळकर, हिमांशू वालदे, लावण्या पिंपळकर, यश आवारी, ओवी आवारी, अगस्त्य पंधरे, श्रेयस घाटे, शिव रागीलवार, जान्हवी पिंपळकर, चैताली राजूरकर, सम्यक घोंगडे, आयुष जोगी, रूद्रा ढवस, संस्कार खाडे, लुब्ध गाउत्रे, सुहान गुडेकर, नव्या जुनगरी, शाक्य भगत, भारती मोंढे, विवेका कुत्तरमारे, पूर्वेश कुत्तरमारे, अक्षरा मांडवकर, डिंपल कुचनकर, घर्षणा कुचनकर, खुश धांडे, मानवी ठावरी, प्रानशू खारकर, ओम खारकर, वैभव काकडे, प्रानवी खारकर, वेदांत देवाळकर, रिया लोढे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  यावेळी शिवशंकर नांदे. अतुल पंधरे, गुणरत्न आवारी,  शेखर मत्ते या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.