कोरोना रुग्णसंख्येने पार केले त्रिशतक, आज 36 पॉजिटिव्ह

रुग्णसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक, तहसिल कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

0

जब्बार चीनी, वणी: आज बुधवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी तालुक्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रेकॉर्ड तुटला. याशिवाय तालुक्याने कोरोना रुग्णसंख्येचे त्रिशतक पार केले. आज तालुक्यात तब्बल 36 रुग्ण आढळून आलेत. या आधी 5 सप्टेंबर रोजी तालुक्यात 31 रुग्ण आढळून आले होते. आज आरटीपीसीआर स्वॅब नुसार 22 तर ऍपिड ऍन्टिजन टेस्टनुसार 14 व्यक्ती पॉजिटिव्ह आले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 319 झाली आहे. आज एका कोरोनाबाधीत रुग्णाचा पांढरकवडा येथे मृत्यू झाला. दरम्यान आज खासगी रुग्णालयाला कोविड रुग्णांचा उपचार करण्यासाठी परवानगी द्यावी याबाबत निवेदन देण्यात आले.

आज यवतमाळहून 58 रिपोर्ट आलेत. यात 22 व्यक्ती पॉजिटिव्ह आल्यात तर 36 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 74 व्यक्तींची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट करण्यात आल्या. यात 14 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आलेत. तर 60 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

सध्या तालुक्यात 319 पॉजिटिव्ह व्यक्ती आहेत. यातील 224 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 91 ऍक्टिव्ह पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. तर आज एका 65 वर्षीय वृद्धाचा पांढरकवडा येथे मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झाल्याची संख्या 4 झाली आहे.

आज 23 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 23 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या कोविड सेंटरला 61 व्यक्तींवर उपचार सुरू असून 30 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 14 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 80 व्यक्ती भरती आहेत.

तहसिल कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
महाराष्ट्रात लॉकडाऊन व संचारबंदी लागल्यानंतर कोरोनाबाबत विविध उपाययोजना करण्यासाठी दिवस रात्र एक करून झटणा-या महसूल विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काल कार्यालयातील एक अधिकारी व्यक्ती पॉजिटिव्ह आली. त्यामुळे ख-या अर्थाने कोविड योद्धा असणारे कर्मचारी किती सुरक्षीत आहे? हा प्रश्न चर्चिला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.