विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच चालला आहे. करीता उपाययोजना म्हणून रंगारी पुरा येथील काही युवकांनी पुढाकार घेत 10 सप्टेंबर बुधावरी सकाळी 11 वाजतापासून संपूर्ण परिसर सॅनिटाइस करण्यास सुरुवात केली.
संपूर्ण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तालुक्यातील कोरोना रुगांची संख्या तिनशेच्या वर गेली आहे. रंगारीपुरा येथेही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. अशा वेळी आपण ज्या परिसरात राहतो तो परिसर स्वच्छ करणे व विषाणूचा पादुर्भाव रोखण्याकरिता सॅनिटाइस करणे आवश्यक होऊन बसले आहे.
शहरातील रंगारीपुरा हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीच्या परिसर म्हणून ओळखल्या जातो. या परिसरात कोरोना सारख्या महमारीचा प्रसार जलद गतीने होऊ शकतो. त्यामुळे येथील युवक मयूर कोत्तलवार, विनोद उके, हरीश मोबिया, आरिफ खान यांनी नगरसेवक विजय मेश्राम यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविला.
यामध्ये रंगारी पुरा प्रभाग क्रमांक 11 मधील संपूर्ण परिसर स्वखर्चातून सॅनिटाइज करण्यात आला आहे. सॅनिटाइस करतांना आपल्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली.