रक्त म्हणजे मानवी शरीरातील सर्वात महत्वाचा घटक

दैनंदिन जीवनामध्ये रक्ताची नियमित गरज

0

सुशील ओझा, झरी: रक्त म्हणजे मानवी शरिरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून ओळखले जाते. दैनंदिन जीवनामध्ये रक्ताची गरज ही देशपातळीवर खूप मोठ्या प्रमाणात आहे. कधी गर्भवती महिला, अपघाती रूग्ण, ऑपरेशन, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजारांत रक्ताची दैनंदिन गरज पडते. तर सातत्याने नियमित दर तीन महिन्याला थैलेसिमीया सिकलसेलच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रूग्णाला रक्ताची गरज पडते.

अपघात व गर्भवतींना तत्काळ रक्ताची गरज भासते. तर कधी कधी रक्ताचा साठा कमी असतो. अशावेळी रक्तदाता शोधण्याची गरज पडते. हीच गरजू गरीब रूग्णांकरीता रक्ताची उपलब्धता करून देण्याचे कार्य रक्तवीर बहुउद्देशीय संस्था करीत आहे. व्हाट्सएप, फेसबूक, इमेल, टेलीग्राम, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचा वापर केला जातो.

कविता, लेख, प्रेरणादायी संदेशांच्या सहाय्याने जनजागृती करून रक्तदाते जुळवीत आहेत. तत्काळ रक्त‌ मिळाल्यास रक्ताअभावी जाणाऱ्या जिवाला आपण नवीन जीवन देऊ शकतो. रक्ताची गरज आहे असे म्हटले, की कशाचाही विचार न करता रक्तदाते रक्त देत आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रसह संपूर्ण भारतभर कुठेही रक्ताची असलेली आवश्यक गरज पूर्ण करते.

मोबाईलमधील असलेल्या सोशल मीडियाचा योग्य वापर करीत रक्ताची चळचळ सुरू आहे. सहकारी मंडळीसह रक्ताची साखळी जोडून ठेवली आहे. जीवनातील सर्वात दुर्मीळ अशा बॉम्बे ब्लडगृपचीदेखील यांच्यामार्फत उपलब्धता होते. एकाच्या रक्तदानामुळे चार गरजु रुग्णांचे प्राण वाचविता येतात. मदत करायची असेल तर अत्यंत आवश्यक गरजू रुग्णाला मोफत रक्तपुरवठा व औषधोपचार होतात.

त्या रूग्णाला सहाकार्य करून त्याची काळजी देखील घेतली जाते. असे अतुलनीय कार्य करीत असणाऱ्या रक्तवीर बहुउद्देशीय संस्था यांनी रक्तगट तपासणी, आरोग्य तपासणी, रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप, शालेय विद्यार्थी मार्गदर्शन कार्यक्रम, नेत्रतपासणी, अनाथ व अपंग बालकांना मदतीचा हात, गरजू रुग्णाला आरोग्य विषयक आर्थिक मदत, वृक्षारोपण, रक्तदानाविषयी जनजागृती, शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम, रक्तविरांचा सत्कार समारंभ, पत्रकार परिषद, बालसंगोपनाकरीता मार्गदर्शनपर मदतीचा हात, ग्रामस्तरीय सक्षमीकरणाचा सप्ताह, प्लाज्मा डोनेशन विषयी जनजागृती इत्यादि प्रकारची उपक्रमे पार पाडत आहेत.

यांच्या अशा या अतुलनीय कार्याची दखल घेऊन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई ‌पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सम्मान झालेला आहे. रक्ताचे नाते ट्रस्ट पुणे, ह्युमन सोशल फाउंडेशन हनुमानगढ़, सोच ब्लड गृप इंदौर, रक्तदाता टिम उज्जैन, ब्लड हेल्पलाईन ‌जम्मु‌कश्मीर टिम, रेड क्रॉस सोसायटी हैद्राबाद, ह्युमन रिस्पॉन्सीबीलिटी तेलंगाना आंध्रप्रदेश, सुभाषचन्द्र बोस रक्तदान समिती सेंधवा मध्यप्रदेश, इत्यादी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पुरस्कारने सम्मानित करण्यात आले आहे.

रक्तवीर बहुउद्देशीय संस्था ही सोशल मीडियातून डिजिटल रक्तसेवा जमीनपातळीवर रक्ताचे अतुलनिय कार्य अविरतपणे निस्वार्थ करीत आहे. रक्तवीर बहुउद्देशीय संस्थेसोबत रक्ताच्या चळवळीमधून निर्माण झालेल्या अनेक संस्था जुळून कार्यरत आहेत. आज संपूर्ण जगावर कोवीड 19 ने कहर केला आहे.

दिवसेंदिवस कोवीड रूग्णांची संख्या वाढत आहे. तरीसुद्धा या अशा परिस्थितीमध्येदेखील रक्तपुरवठा करण्याचे हे कार्य अविरतपणे सुरू आहे. या संस्थेचा सहावा वर्धपानदिन साजरा करण्यात आला. या संस्थेमार्फत आपल्या तालुक्यातील प्रियल पथाडे, प्रफुल भोयर, गणेश मुद्दमवार तसेच निखील‌ धबडगे, यशवंत गिरी, सुनील नलगंटीवार, मोनेश्वर खंडारे, हेमराज गीते, अभिषेक ठाकूर, गोकुल जुमनाके, सागर ईळकर, स्वप्नील अलगदेवे, राहुल कुरझडकर, भूषण फरांडे, शुभम निपाने, तसेच युवक व युवती कार्य‌ करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.