कुणबी महिला आघाडीने केला कोरोनायोद्धांचा सन्मान

प्रशासकीय यंत्रणेचा सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

0

जब्बार चीनी, वणी: धनोजे कुणबी महिला आघाडीने कोरोनायोद्धा म्हणून कार्य करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा सन्मान केला. कोरोनाच्या आतिशय कठीण काळात प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या जीवाची काळजी असते. प्रशासकीय यंत्रणा मात्र कुठलीही भीती किंवा परिवाराची चिंता न बाळगता सतत कोरोनासंदर्भात जनजागृती करीत आहे. कोरोना पेशंट शोधत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार अविरतपणे करीत आहे.

अशा कठीण काळात प्रत्येकाचं मनोबल वाढण्यासाठी एक कौतुकाची थाप हवी असते. याची जाणीव ठेवून धनोजे कुणबी महिला आघाडीने कोरोनायोद्ध्यांचा सन्मान केला. उपविभागीय अधिकारी शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक‌, तहसीलदार श्यामकुमार धनमने, ठाणेदार वैभव जाधव, पोलिस कर्मचारी, होमगार्ड तसेच वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक नंदकुमार आयरे,

पोलीस उपनिरीक्षक प्रफुल डाहूले व वाहतूक विभागाचे कर्मचारी तसेच समाज प्रबोधनाचे कार्य करणारे साहेबराव निबुधे व कोरोना तपासणी केंद्र येथे सेवा देत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप येडमे, अमित शेंडे, डॉ. विवेक गोफणे, वैशाली गोफणे, तेथील सर्व कर्मचारी, ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, शिरीष ठाकरे, भालचंद्र आवारी, वणी ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी यांचा कोरोनायोद्धा म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला .

यावेळी धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा वंदना आवारी, उपाध्यक्षा कविता चटकी, लता वासेकर, मीनाक्षी देरकर, किरण देरकर, संध्या नांदेकर, अर्चना बोदाडकर, वंदना धगडी, मनीषा टोंगे उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.