मारेगावात आज पुन्हा एक पॉझिटिव्ह

वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरात आज जनता कर्फ्यूबाबत बैठक

0

नागेश रायपुरे, मारेगाव: आज सोमवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी आलेल्या रिपोर्टनुसार शहरातील 1 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 11 व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे दहशतीत आलेल्या नागरिकांना आज रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याने दिलासा मिळाला आहे. सध्या तालुक्यात कोरोनाचे 27 रुग्ण असून यातील 1 रुग्ण बरा झाला असून 26 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दरम्यान शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन शहरातील काही मान्यवरांनी जनता कर्फ्यूबाबत बैठक आयोजित केली आहे.

यवतमाळहून 32 रिपोर्ट येणे बाकी होते. त्यातील 12 कोरोनाचे रिपोर्ट प्राप्त झाले. यात 11 रिपोर्ट निगेटिव्ह तर 1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदर पॉजिटिव्ह व्यक्ती ही प्रभाग क्रमांक 4 (बस स्टँड) परिसरातील आहे. रुग्णाच्या घराच्या शेजारचा परिसर सिल करण्यात येत आहे.

आज आलेल्या पॉजिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील नागरिकांना नाव ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान नागरिकांनी शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.

आज जनता कर्फ्यूसंदर्भात बैठक
कोरोनापासून कोसो दूर असलेल्या मारेगाव शहरात अचानक रुग्णसंख्या वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी “कोविड दक्षता ग्रुप”च्या वतीने आज शहरातील राष्ट्रीय विद्यालयातील जगन्नाथ बाबा मंदिर येथे 12 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. एकीकडे अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे तर दुसरीकडे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.