मारेगावात गुरुवारपासून 4 दिवसांचा जनता कर्फ्यू
चेंबर ऑफ कॉमर्सचा पुढाकार, सहकार्याचे आवाहन
नागेश रायपुरे, मारेगाव: पूर्वी कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात आता कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. त्यामुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अखेर चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने पुढाकार घेतला. येत्या गुरुवार ते रविवार असा चार दिवसांचा “स्वयंघोषित जनता कर्फ्यू “चा निर्णय घेण्यात आला आहे. या विषयी तहसीलदार यांना निवेदन सुद्धा देण्यात आले आहे.
मारेगाव तालुक्यातील शासकीय कार्यालय व व्यापारी वर्गांसह गावखेड्यातसुध्दा कोरोनाने एन्ट्री केली. नागरिकांत दहशतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. त्यामुळे वेगाने वाढत असलेल्या कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मेडिकल व दवाखाने वगळून दिनांक 17 ते 20 सप्टेंबर या चार दिवसांकरिता मारेगाव बंदचे आवाहन चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटने कडून करण्यात आले आहे.
निवेदन देते वेळी शहरातील चेंबर ऑफ कामर्स या संघटनेचे लहान मोठे व्यापारी वर्ग उपस्थित होते.
(बॉक्स) तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा स्वयंघोषित जनता कर्फ्फु आयोजित केला आहे. तरी मारेगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने गुरुवार ते रविवार या चार दिवसाच्या कालावधीत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवावी व या “स्वयंघोषित जनता कर्फ्फु” ला सहकार्य करावे असे आवाहन चेंबर ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेने केला आहे.
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)