लग्नाचेआमिष दाखवून युवतीचे शारीरिक शोषण:

गेल्या 7 वर्षांपासून सुरू होता प्रकार

0

विवेक तोटेवार, वणी: शहरात राहणाऱ्या एका युवतीचे गेल्या सात वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या युवकावर युवतीच्या तक्रारीवरून कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार 16 सप्टेंबर रोजी घडली. तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

मूर्धोनी येथे राहणाऱ्या गजानन नात्थुजी गोदलकर (28) असे आरोपीचे नाव आहे. सात वर्षांपूर्वी त्याचे सूत वणी येथील युवतीशी जुळले. तेव्हापासून गजानन हा तिच्याशी लग्न करतो म्हणून शोषण करीत होता. परंतु आता त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम 376, 2 (N) नुसार गुन्हा नोंद केला आहे. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी आरोपीस अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माया चाटसे करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.