रवी ढुमणे, वणी: जिल्ह्यातील १६ ही तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात यावे अशी मागणी श्री गुरूदेव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरल्या जात आहे. तहसिलदारांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी चांगलीच डोके दुखी बनली असून शेतकऱ्यांना आपले अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरण्यासाठी सरकारची लिंकच दिवसभर राहत नाही. ही लिंक रात्री २ ते ३ वाजता खुली होत असल्याने सकाळ पासून रात्रभर शेतकऱ्यांना इंटरनेट कॅफे व महाऑनलाइन केंद्रावर ताटकळत राहावे लागत आहे. पाण्यापावसाच्या दिवसात त्यांना अत्यंत बिकट परीस्थीला सामोरे जावे लागते. दिवसभर शेतात काम करून रात्रभर त्याला जागे रहावे लागत आहे. एखाद्या वेळी लिंक न मिळाल्यास त्यांना दोन दोन दिवस चकरा माराव्या लागत आहे. तो तर येतोच पण त्यांचे सोबत पत्नीला देखील आणावे लागत आहे.
जे शेतकरी महिला त्यांच्या पती सोबत असेल त्या महीलेची सुरक्षा काही प्रमाणात होईल, परंतु ज्या महिला विधवा आहे त्यांच्या सुरक्षे संदर्भात कोणतीच उपाय योजना नाही. खासगी केंद्रावर शेतकऱ्यांची पूर्णता अवहेलना होत आहे. खासगी केंदही्र शेतकऱयांची लुट करीत आहे.
शेतकऱ्यांना एक पर्याय म्हणून तहसिल कार्यालयात परिपूर्ण सोयी सुविधांनी संपन्न असे सेतू सुविधा केंद्र आहे. तहसिल कार्यालयाच्या इमारती मोठ मोठ्या असून सेतू केंद्रात ५ ते ६ संगणक व कुशल कामगार आहे. इंटरनेट व इन्वर्टर ची पूर्णता सोय आहे. याचा वापर शेतकऱ्यांसाठी करावा जनेकरुन शेतकऱ्यांची भटकंती थांबेल व शेतकऱ्यांना सुरक्षाही मिळेल. हे अर्ज भरण्याच्या कालावधीत सेतू केंद्रात तहसिलदार व निवासी नायब तहसिलदार यांना उपस्थित ठेवावे. अशी ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी श्री गुरूदेव सेनेचे मुख्य संयोजक दिलीप भोयर, संघटक मिलिंद पाटील, मंगल तेलंग, देवराव पाटील धान्डे, सुधाकर चांदेकर, दिलीप पिदुरकर, आनंदराव पानघाटे, सुधाकर नालमवार, पुंडलिक वाभिटकर, बाळाजी काकडे, उत्तम पाचभाई यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.