अर्जुनी, मांगरुळ, सगणापूर येथे कोरोनाची एन्ट्री

मारेगाव तालुक्यात कोरोनाचा सिक्सर....

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. आज शनिवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहे. मारेगाव तालुक्यात एकूण 46 पॉजिटिव्ह रुग्ण झाले असून यातील 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून यातील 19 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत.

आज कोरोनाने अर्जुनी, मांगरुळ, सगणापूर येथे एन्ट्री केली आहे. अर्जुनी येथील 1 महिला व 2 पुरुष, मांगरुळ येथील 2 महिला तर सगणापूर येथील 1 पुरुष असे एकूण 6 पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ट्रेस करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.

तालुक्यात रॅपीड टेस्ट द्वारे 726 तर आर टी पीसीआर द्वारे 539 असे 1265 व्यक्तीचे कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. यात 46 रुग्ण आढळून आले आहेत. यात 19 रुग्ण ऍक्टिव्ह असून 27 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुट्टी मिळाली आहे.

दरम्यान कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मारेगाव येथे 4 दिवसांच्या जनता कर्फ्यूचे आयोजन करण्यात आले आहे. याचा आज 3 रा दिवस आहे. याला तिस-या दिवशीही मारेगाव वासियांचा उत्स्फुर्त प्रतिसाद असला तरी शहरातील दरम्यान देशी दारुचे सर्व दुकानं उघडी असल्याने संताप व्यक्त होत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.